🕒 1 min read
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समर्थनासाठी शिवसेना पक्षातील आमदार त्यांच्यासोबत गेले आणि राज्यात शिंदे यांचं सरकार स्थापन झालं. तेव्हापासून शिंदे गट आणि ठाकरे गट असे गट पडले आहे. दोन्ही गटातील नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाची खेळत असतात. अशातच पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी शिवसेनेचे नेते आणि माजी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. यानंतर शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी यावरून पटलांवर जोरदार टीकास्त्र सोडलंय.
गुलाबराव पाटील काय म्हणाले होते ?
32 वर्षांचा पोरगा उठतो आणि आमच्यावर टीका करतो. अरे बाबा तुम्ही गोधडीतही नव्हता तेव्हापासून आम्ही शिवसेनेत आहोत, असं म्हणत गुलाबराव पाटील यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. गुलाबराव पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. अली बाबा और उसके चालीस चोर थे, तसं आम्हीही शिंदे बाबा के चालीस आमदार आहोत, असंही ते म्हणाले आहेत.
चंद्रकांत खैरेंच गुलाबराव पाटलांना प्रत्युत्तर
माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर टीका करणाऱ्या पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांचा गळा दाबीन, आपल्याला राग आला तर काहीही करु शकतो. जे काय व्हायचं ते होईल, पण गुलाबराव यांना माफी मागायला लावीन, असा इशारा चंद्रकांत खैरे यांनी दिला आहे. तसेच राज्यात सध्या उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि शिंदे गट यांच्यात शिवसेना कुणाची यावरुन संघर्ष सुरु आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो न लावता निवडून येऊन दाखवा असे आव्हान उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्याकडून करण्यात येते आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Uddhav Thackeray । “या दसरा मेळाव्याला मुख्यमंत्रीपदाचा मास्क तोंडावर नसेल, त्यामुळे…”; उद्धव ठाकरेंचा विरोधकांना इशारा
- Uddhav Thackeray : अमित शहा यांचे आव्हान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, म्हणाले…
- Bhaskar Jadhav | अमित शहांनी शब्द दिला होता, पण ते मान्य करत नाहीत – भास्कर जाधव
- Devendra Fadnavis | मुंबई महानगरपालिकेवर आमचा भगवा फडकणार – देवेंद्र फडणवीस
- Shivsena | तेव्हा तुम्ही सी ग्रेड फिल्म करण्यात बिझी होता, अन् आता फड उभा करून कमळाबाईची सुपारी वाजवताय!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
