मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांच्या सीबीआय चौकशी प्रकरणात काल बुधवारी रात्री अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. देशमुख यांचे जावई डॉ. गौरव चतुर्वेदी यांना सीबीआयने अपहरण करुन ताब्यात घेतल्याचा आरोप वकिलांनी केला. त्यानंतर देशमुख यांचे वकील आनंद डागा यांनाही सीबीआयनं ताब्यात घेतले. तसेच सीबीआयचे सब इन्स्पेक्टर अभिषेक तिवारी यांना अटक करण्यात आली. यामुळे सगळ्या प्रकरणाला एक वेगळं आणि नाट्यमय वळण मिळाले. वकिलांनी सीबीआय अधिकाऱ्याला पैसे देऊन प्राथमिक चौकशी अहवाल लीक केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
या कारवाईवर राष्ट्रवादी काँग्रेसने तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. ‘या देशात कायद्याचे राज्य आहे की केंद्रातील राज्यकर्त्यांनी या देशात नवीन कायदा केला आहे’, असा संतप्त सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे.
संध्याकाळी अनिल देशमुखजी यांच्या कन्या, सून त्यांचे जावई व वकील वरळी निवासस्थानातून बाहेर पडत असताना त्यांची गाडी अडवून त्यांचे जावई व वकिलांना दहा-बारा लोकांनी ताब्यात घेऊ सोबत नेले. कुठलीही माहिती मुलीला किंवा कुटुंबातील महिलांना देण्यात आली नाही. pic.twitter.com/AxmRhUfeCu
— Nationalist Congress Party – Sharadchandra Pawar (@NCPspeaks) September 1, 2021
‘अनिल देशमुख यांची मुलगी, सून, जावई आणि वकील वरळी येथील निवासस्थानाबाहेर येत असताना अचानक दहा – बारा जणांनी त्यांची गाडी अडवून वकील व जावई यांना ताब्यात घेतले आणि सोबत घेऊन गेले आहेत. याबाबत कुठलीही माहिती देशमुख यांच्या मुलीला किंवा सूनेला दिलेली नाही, असा आरोपही नवाब मलिक यांनी केला आहे. एकंदरीत ही सर्व कारवाई बेकायदेशीर किंवा नियमाला धरून नसल्याने सीबीआयने तात्काळ याचा खुलासा करावा अशी मागणीही नवाब मलिक यांनी केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘…तर आपण परमनंट लॉकडाऊनमध्ये गेलो असतो’; फडणवीसांच महत्वाचं विधान
- दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज डेल स्टेनची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती
- ‘भास्कर जाधवच्या मुलाने मंदिरात अभिषेक केलेला चालतो, पण सामान्यांसाठी मंदिरे बंद’
- ‘तुमची बाहेर पडायला फाटते त्यात आमचा काय दोष’ ; उद्धव ठाकरेंना अप्रत्यक्ष टोला
- रिलायन्स जिओचे खास प्लॅन्स; Disney+ Hotstar सबस्क्रिप्शन मिळणार मोफत

