🕒 1 min read
मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात ईडी आणि सीबीआयची कारवाई सुरु आहे. अनिल देशमुख आणि मुलगा ऋषिकेश देशमुख यांना ईडीने समन्स बजावले आहेत. अनिल देशमुख यांनी प्रकृतीचे कारण देत चौकशीस हजर राहणार नसल्याचे सांगितले आहे. तसेच काही दिवसांपूर्वी ईडीने अनिल देशमुख यांच्या नागपुरातल्या फेटरी येथील कॉलेजवर देखील धाड टाकली आहे.
दरम्यान सध्या अनिल देशमुख यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. आता खाजगी बँकांकडून अनिल देशमुख यांनी नियमांचं उल्लंघन करत कर्ज घेतल्याचं समजतंय. त्यामुळे आता नियमांचं उल्लंघन करुन लोन पास करण्यासाठी देशमुखांनी नेमकं काय केलं होतं, याचा तपास ईडी आता करत आहे.
लोन म्हणून मिळालेली रक्कम देशमुख यांनी अशा कंपन्यांना ट्रान्सफर केली, ज्या कंपन्यांवर अनिल देशमुख यांच्या कुटुंबियांचा हक्क आहे, अशी माहिती सध्या तरी समोर येत आहे. तसेच ईडीने या कंपन्यांची चौकशी केल्यावर अशी माहिती समोर आली आहे की, यातल्या काही कंपन्या खऱ्या तर काही शेल आहेत. त्यामुळे ईडी आता लोन घेतलेल्या पैशांचं काय केलं याची चौकशी करत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘आरक्षण तर भाजपच देईल म्हणणाऱ्या दानवेंचं तोंड बंद का होतं?,’ विनायक राऊत यांचा सवाल
- सोलापूर जिल्ह्यावर लादण्यात आलेल्या निर्बंधांना व्यापारी महासंघाने केला तीव्र विरोध
- ‘खेळाडूंना ओळखण्यासाठी शेजाऱ्याकडून चष्मा उधार घ्यावा लागेल’, सोशल मीडियावरून मोदींवर टीका
- निर्बंध शिथिल करण्याबाबत पुण्याला वेगळा आणि सोलापूरला वेगळा न्याय का ?
- ‘अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक उत्थानासाठी समिती गठित करणार’- वर्षा गायकवाड
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
