Share

अनिल देशमुख चौकशी अहवाल लीक प्रकरण; सीबीआयने त्यांच्याच पथकातील अधिकाऱ्याला केली अटक

Published On: 

मुंबई : महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे वकील आनंद डागा यांना सीबीआयने मुंबईत अटक केली आहे. त्यांना पुढील चौकशीसाठी दिल्लीला नेले जाणार आहे. पोलीस उपनिरीक्षकाच्या माध्यमातून तपास प्रभावित करण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली डागा यांना अटक करण्यात आली आहे.

दरम्यान, एका बाजूला या घडामोडी घडत असताना दुसऱ्या बाजूला आणखी एक लक्ष्यवेधी कारवाई करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी देशमुख प्रकरणातील सीबीआयचा प्राथमिक चौकशी अहवाल लीक झाला होता. याच प्रकरणात सीबीआयने त्यांच्याच पथकातील उपनिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याला अटक केल्याची माहिती मिळत आहे. त्या अधिकाऱ्याचे नाव अभिषेक तिवारी असे असल्याचे समोर आले आहे. डागा आणि तिवारी हे एकमेकांच्या संपर्कात असल्याचं देखील सांगितले जात आहे.

वकील आनंद डागा आणि पोलीस उपनिरीक्षक या दोघांनाही सीबीआयने ट्रान्झिट रिमांडवर ही अटक करण्यात आली असून त्यांना दिल्लीला नेण्यात येणार आहे. तसेच तिथे नेल्यावरच त्यांना कोर्टात हजर केलं जाणार आहे. विशेष म्हणजे आनंद डागा यांचे आणि तिवारी यांचे आर्थिक व्यवहार झाल्याचा सीबीआयला संशय आहे. अलाहबाद येथे आर्थिक व्यवहार झाल्याचा संशय आहे. मुंबई, दिल्ली आणि अलाहबाद येथे रात्री उशीरा पासून सीबीआयचे छापे सुरु आहेत.

अनिल देशमुख यांना सीबीआयने क्लिन चिट दिल्याचा सीबीआयचा अहवाल सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. हा अहवाल बाहेर कसा आला याचा सीबीआय मागच्या सहा दिवसापासून तपास करत होते. त्यांनतर ही कारवाई झाली. काल सीबीआयने अनिल देशमुख जवाई गौरव चतुर्वेदी यांची देखील विचारपूस केली होती आणि नंतर त्यांना सोडून देण्यात आले.

महत्त्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!