🕒 1 min read
Anil Desai | मुंबई : मुंबईत केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपा नेते अमित शाह (Amit Shah) यांच्यावर आधारित एका पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पार पडला. या कार्यक्रमात बोलताना देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. शिवसेनेने २०१४ मध्ये फक्त चार जागांसाठी युती तोडली आणि बेईमानी केली असं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली. फडणवीसांच्या या टीकेला ठाकरे गटाचे नेते अनिल देसाई (Anil Desai) यांनी प्रत्युत्तर दिलंय.
ते म्हणाले, “जशा आठवणी फडणवीस यांच्याकडे आहेत, तशाच आमच्याकडेही आहेत. मात्र आम्ही त्याची वाच्यता करत नाही.” आमच्याकडे 2009 च्या आणि त्यापूर्वीच्याही आठवणी आहेत. मात्र आम्ही भाष्य करणार नाही, असं देसाई म्हणालेत. आज दिल्ली उच्च न्यायालयात राज्यातील सत्तासंघर्षासंदर्भात सुनावणी होती. यावेळी ते बोलत होते.
दरम्यान, काल रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात बैठक झाली. या बैठकीवरही अनिल देसाई यांनी प्रतिक्रिया दिलीय. काही दिवसांपूर्वी वेषांतर करुन बैठका केल्या. आता पुन्हा बैठक होत आहेत. गुप्त बैठका होत आहेत. यातून काय साध्य होणार हे पाहावं लागेल, असंही अनिल देसाई म्हणालेत.
नेमकं काय म्हणालेत देवेंद्र फडणवीस?
देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) म्हणाले, “शिवसेनेने बेईमानी केली, पण अमित शाह (Amit Shah) यांच्या रणनीतीच्या जोरावर आपण निवडणूक जिंकली.” पुढे ते म्हणतात, “महाराष्ट्राच्या २०१४ च्या निवडणुकीत आपण शिवसेनेसह युती करण्यास तयार होतो. आपण कमी जागा लढण्यासही तयार होतो. पण केवळ चार जागांसाठी शिवसेनेने युती तोडली.
महत्वाच्या बातम्या :
- Jitendra Awhad | मोठी बातमी! जितेंद्र आव्हाडांना विनयभंग प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर
- Devendra Fadanvis | “११७ जागा लढणारा भाजपा, २८८ जागा लढण्यास तयार होण्याचं कारण म्हणजे…”
- Best SUV Car | ‘या’ आहेत भारतीय बाजारातील लोकप्रिय SUV कार
- Ajit Pawar | “दारू पिता का…” ; अजित पवारांनी घेतला अब्दुल सत्तारांचा समाचार, मुख्यमंत्र्याना आवाहन
- Arvind Sawant | “कालचा ठाण्यातील प्रकार मुख्यमंत्र्यांवर मोठं लांछन आहे”, अरविंद सावंत यांचं टीकास्त्र
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

