Share

विद्यार्थ्यांचा संताप!  हँग वेबसाइटमुळे अकरावी सीईटी परीक्षेची नोंदणी तूर्तास रद्द

Published On: 

औरंगाबाद : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा दहावी आणि बारावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या होत्या. मात्र मूल्यांकनानुसार दहावीचा निकाल नुकताच घोषित करण्यात आला आहे. अकरावीच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना सीईटी परीक्षा मात्र बंधनकारक करण्यात आली आहे. सीईटी चे अर्ज भरण्यासाठीची वेबसाईट वारंवार हँग होत असल्याने राज्य मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी राञी उशीरा पञ जारी करून सीईटीची अर्ज प्रक्रिय तूर्तास थांबवण्याचा निर्णय घेतला आहे.

राज्य शासनाच्या निर्णयानुसार दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना अकरावीत प्रवेश घेण्यासाठी सीईटी द्यावी लागणार आहे. या सीईटीचे अर्ज विद्यार्थ्यांना ऑनलाइन भरावे लागणार आहे. राज्य मंडळाने सीईटीचे अर्ज भरण्याचे वेळापञक देखील जाहीर केले होते. २० जुलैपासून ते २६ जुलैपर्यंत सर्व विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज करायचे होते. सीईटीची परीक्षा २१ ऑगस्ट रोजी होणार होती. मात्र सीईटीचे अर्ज करण्याची वेबसाईट पहिल्याच दिवशी वारंवार हँग झाली. त्यामुळे दुरूस्ती करणे आवश्यक असल्याने मंडळाने तूर्तास अर्ज प्रक्रिया थांबवली आहे.

मात्र यामुळे आता विद्यार्थी आणि पालकांमध्ये गोंधळ निर्माण झाला आहे. तथापि, विद्यार्थ्यांना कुठलीही अडचण येणार नाही, असाच निर्णय राज्य मंडळ घेईल, असे मंडळाचे विभागीय उपसंचालक अनिल साबळे यांनी स्पष्ट केले आहे. पुढील दोन दिवसात वेबसाइट सुरू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे, विद्यार्थ्यांनी गोंधळून जाता कामा नये. वेबसाइटवरील तांञिक समस्या दुर झाली, की लगेच सीईटीची अर्ज प्रक्रिया होईल. वेबसाइट दुरूस्त होण्यास जेवढा कालावधी लागेल, तेवढा कालावधी राज्य मंडळ वाढवून देणार आहे. त्यामुळे, विद्यार्थ्यांनी निश्चिंत राहावे, असे आवाहान विभागीय शिक्षण उपसंचालक साबळे यांनी केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!