🕒 1 min read
नवी-दिल्ली : अंदमान आणि निकोबार बेटांवर नेताजी सुभाषचंद्र बोस बेटावर एका जनसभेला संबोधित करतांना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी अप्रत्यक्षरीत्या काँग्रेसवर टीका केला. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर नेताजी सुभाषचंद्र बोस आणि सरदार वल्लभभाई पटेल यांना इतिहासात पुरेसा आदर आणि सन्मान मिळाला नाही, असे ते म्हणाले.
यावेळी बोलतांना शहा म्हणाले की,’पंतप्रधान मोदी यांनीच दोन्ही स्वातंत्र्य सैनिकांचा सन्मान केला आणि अंदमानमध्ये ३० डिसेंबर १९४३ रोजी नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी भारतीय भूमीवर प्रथमच ज्या ठिकाणी ध्वज फडकवला होता, त्या ठिकाणी ‘फ्लॅग पॉइंट’चे उद्घाटन केले. आम्ही स्वातंत्र्य संग्रामादरम्यान सरदार पटेल यांच्या योगदानाचा आणि बलिदानाचा सन्मान करण्यासाठी केवडियामध्ये जगातील सर्वात उंच पुतळा उभारला. मजबूत भारत बनवण्यामागील त्यांचे योगदान आम्ही कधीही विसरू शकत नाही.’
दरम्यान, पुढे ते म्हणाले की,’भविष्यात, अंदमान आणि निकोबार बेटांना देशभक्तांसाठी तीर्थक्षेत्र बनवण्याची आमची योजना आहे. आम्ही नेताजींची जयंती परक्रम दिवस म्हणून साजरी करायला सुरुवात केली आहे आणि लवकरच आम्ही पोर्ट ब्लेअरमध्ये नेताजींचे भव्य स्मारक उभारू. मी या देशातील सर्व युवकांना विनंती करू इच्छितो की, एकदा आमच्या अंदमानला भेट देऊन आमच्या स्वातंत्र्य सैनिकांनी दिलेल्या त्यागाला समजून घ्या’. तसेच अंदमान आणि निकोबार बेटांवर २९९ कोटी रुपयांचे १४ विकास प्रकल्प आणि ६४३ कोटी रुपयांच्या १२ प्रकल्पांची पायाभरणी आधीच करण्यात आली आहे. तसेच केंद्र सरकार या बेटांच्या विकासासाठी वचनबद्ध आहे, असेही ते म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या
- मोदी सरकारमधील महत्त्वाच्या समितीवर खासदार इम्तियाज जलील यांची फेरनिवड!
- सिंघू बॉर्डरवर हत्या करणारा सरवजीत म्हणतो, “मला अजिबात पश्चाताप होत नाही”
- ‘अजित पवार आणि त्यांच्या निकटवर्तीयांची बुधवारी आणखी एक पोलखोल करणार’
- मोदींची घोषणा! अयोध्येच्या तीर्थयात्रेसाठी भाजप सरकार ५० हजारांची आर्थिक मदत करणार
- ‘नातेवाईकांचीही चौकशी, त्यांना त्रास देणे हे बरोबर नाही’, गृहमंत्री वळसे पाटलांची प्रतिक्रिया
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
