Share

कोरानाची तिसरी लाट ग्राह्यधरुन तयारी सुरू: पालकमंत्री नवाब मलिक

Published On: 

परभणी : कोरोना संसर्गाची तिसरी लाट ग्राह्यधरून जिल्हा प्रशासनाने सर्वोतोपरी तयारी सुरू केली आहे, अशी माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री नवाब मलिक यांनी शनिवारी दिली आहे. महाराष्ट्र दिनी पालकमंत्री यांनी परभणी जिल्हा दौऱ्या दरम्यान ते परभणीमध्ये होते.

जिल्हाधिकारी कार्यालयात शनिवारी सकाळी आयोजीत केलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. पालकमंत्री नवाब मलिक यांनी या जिल्ह्यात शहरी तसेच ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा सर्वार्थाने सक्षम व्हावी, या दृष्टीकोनातून प्रशासनाद्वारे सर्वतोपरी प्रयत्न सुरू केलेले आहेत. विशेषतः भविष्यातील कोरोनाची तिसरी लाट ग्राह्य धरून प्रशासनाद्वारे आरोग्य सुविधांमध्ये मोठी वाढ व्हावी, असे प्रयत्न सुरू केले आहेत. साडेतीन हजार बेड्स उपलब्ध आहेत. ते पाच हजारांपर्यंत जावेत यादृष्टीने प्रयत्न आहेत. जम्बो कोविड सेंटर व्यक्तीरिक्त कृषी उत्पन्न बाजार समित्यांना सुद्धा कोविड सेंटर करिता मान्यता दिल्या जाणार आहेत. या बाबत देखील माहिती सांगितली.

तसेच मोठ्या प्रमाणावर कोरोनाच्या चाचण्या वाढाव्यात, असेही प्रयत्न सुरू आहेत. शहरासह आठही तालुकास्थानी ऑक्सिजन प्लांट सुरु व्हावेत म्हणून प्रयत्न आहेत. या स्थितीत जिल्ह्यामध्ये ऑक्सिजनचा तुटवडा नाही. ५० केएल लिक्वीड ऑक्सिजन उपलब्ध होत आहे. लिक्वीड ऑक्सिजनचा पुरवठा व ऑक्सिजनचा पुरवठा ही वाढवण्याचे काम देखील सुरु करण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत. पुण्यातून २० केएल व बेल्लारी (कर्नाटक) येथून २० केएल ऑक्सिजनचा पुरवठा होतो आहे. ११ जनरेशन प्लांटचे काम प्रगतीपथावर सुरु झाले आहे. रुग्णांची संख्येत वाढ झाल्यास ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत रहावा, असे प्रयत्न सुरु केले असल्याचे या वेळी पालकमंत्री नवाब मलिक यांनी सांगितले.

महत्त्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!