Share

…आणि बेन स्टोक्सने अप्रतिम झेल घेत युनिवर्सल बॉस क्रिस गेल ला पाठवलं माघारी !

Published On: 

मुंबई : सध्या आयपीएलचा ‘रण’संग्राम सुरु आहे. आयपीएलचं हे चौदावं सत्र असून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विनाप्रेक्षक निवडक स्टेडियममध्ये खेळवलं जात आहे आहे. आज राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग्ज या दोन संघांमध्ये झुंज पाहायला मिळत आहे. हा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये सुरु आहे. राजस्थानच्या संघाने टॉस जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

संजू सॅमसनकडे राजस्थान रॉयल्सचे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे. तर के एल राहुलकडे पंजाबची धुरा आहे. दोन्ही संघाचा या हंगामातील पहिला सामना असून विजयासाठी मोठी रस्सीखेच पाहायला मिळत आहे. दरम्यान, सलामीवीर मयांक अग्रवाल बाद झाल्यानंतर युनिवर्सल बॉस क्रिस गेल मैदानात आला. त्याने धडाकेबाज सुरुवात केली होती.

 

त्याने दोन छक्के आणि चार चौके मारून २८ चेंडूंमध्ये ४० धावांची खेळी केली आहे. मात्र गेलच्या खेळीला वेळीच रोख लावण्यासाठी संजय सॅमसनने रियान परागकडे चेंडू सोपवला आणि गेल त्याच्या जाळयात अडकला. गेलने परागच्या चेंडूवर फटका मारला, मात्र बेन स्टोक्सने धावत येऊन चेंडूचा अप्रतिम झेल घेतला. यामुळे गेलला माघारी परतावं लागलं असून स्टोक्सच्या या झेलाचं कौतुक केलं जात आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!