Share

ठाण्यात शिवसेना राष्ट्रवादीत जुंपली; आनंद परांजपे यांची सेनेवर घणाघाती टीका 

Published On: 

ठाणे – राज्यात महाविकास आघाडीत एकत्र असलेले शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे तिन्ही पक्ष स्थानिक पातळीवर मात्र आपापसात कोणत्या न कोणत्या कारणावरुन भांडतानाच दिसत आहेत. ठाण्यात लसीकरण मोहीमेवरुन शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नवा वाद निर्माण झाला आहे.

ठाण्याचे राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष आणि माजी खासदार आनंद परांजपे यांनीही लसीकरण मोहीमेवरुन शिवसेना करत असलेल्या बॅनरबाजीवरुन टोलेबाजी केली आहे. पालिका प्रशासन लसीकरण करत असताना खारेगावात शिवसेनेकडून पोस्टरबाजी केली जात आहे. आता लसी बनवण्याचं काम शिवसेनेने सुरु केलंय का? महाविकास आघाडी सरकार आणि प्रशासनामार्फत हे लसीकरण सुरु आहे. त्यामुळे याचं श्रेय हे फक्त शिवसेनेचं नाही तर संपूर्ण महाविकास आघाडीचं आहे , अशा शब्दांत परांजपे यांनी शिवसेनेला टोला लगावला आहे.

ठाणे शहरातील नागरिकांचे लसीकरण ठामपा करीत असताना लसीकरण केंद्रात मात्र शिवसेनेच्याा नेत्यांचे पोस्टर्स लागलेले आहेत. कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सीनचे मॅन्युफ्रॅक्चरींग शिवसेनेने सुरु केले आहे का? महाराष्ट्र सरकारच्या मार्फत ठामपाला आणि ठामपाच्या मार्फत ते ठाणेकरांना देण्यात येते. याचे श्रेय महााविकास आघाडीला आहे, शिवसेनेला नाही, याची जाणीव खा. शिंदे यांनी ठेवावी, असा टोला परांजपे यांनी लगावला आहे.

यावेळी बोलत असताना आनंद परांजपे यांनी जिथे-जिथे पालिकेकडून लसीकरण होत आहे तिकडे शिवसेना पोस्टरबाजी करुन श्रेय घेण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला. ठाणे महापालिकेचे आयुक्त विपीन शर्मा हे आता शिवसैनिक होणार आहेत का असा प्रश्न विचारत परांजपेंनी शिवसेनेवर टीका केली आहे. त्यामुळे स्थानिक शिवसेना नेते आता या आरोपांचं कसं उत्तर देतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!