Share

मोहम्मद युसूफ खान ते दिलिप कुमार नावामागे आहे एक रंजक कहाणी

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: बॉलीवुडचे पहिले सुपरस्टार आणि जेष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचे निधन झाले आहे. आज ७ जुलै रोजी सकाळी ७.३० मीनिटांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दिलीप कुमार यांचे वय ९८ होते. गेल्या काही दिवसापासुन दिलीप कुमार यांना श्वास घ्यायला त्रास होत होता. यामुळे उपचारासाठी त्यांना २९ जुन रोजी मुंबई येथील हिंदूजा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यादरम्यान त्यांची प्रकृती खालावत गेली आणि आज ७ जुलै रोजी त्यांची प्राणज्योत मालवली. दिलीप कुमार यांचा जन्म ११ डिसेंबर १९२२ साली त्यांचा जन्म झाला होता.

दिलीप कुमार यांचे  खरं नाव मोहम्मद युसूफ खान होतं. चित्रपटांमध्ये आल्यानंतर त्यांचं खरं नाव बदललं आणि दिलीप कुमार ठेवलं.  त्यानंतर दिलीप कुमार हे नाव संपूर्ण सिने इंडस्ट्रीत गाजू लागल, मात्र या नावमागे देखील गोष्ट आहे. चला तर मग ते जाणून घेऊयात …

आपली आत्मकथा ‘द सबस्टँस अँड द शॅडो’ यात त्यांनी लिहिलंय, एक दिवस दिलीप कुमार चर्चगेट स्टेशनवर ट्रेनची वाट पाहत असताना त्यांच्या ओळखीचे सायकोलॉजिस्ट डॉ. मसानी भेटले. ते ‘बॉम्बे टॉकिज’च्या मालकीण देविका राणी यांना भेटायला निघाले होते. ते सोबत दिलीप कुमार यांनाही घेऊन गेले. परंतु त्यांना तिथे जाण्याची इच्छा नव्हती, मात्र तरीही चित्रपटाचा स्टुडिओ पाहण्यासाठी ते गेले. देविका राणी यांच्या भेटीदरम्यान त्यांनी दिलीप कुमार यांना 1250 रुपयांच्या नोकरीचा प्रस्ताव दिला, तसंच अभिनेता बनण्याबाबतही विचारणा केली. 1250 रुपये पगार देण्याच्या आकर्षणाने त्यांना ‘बॉम्बे टॉकिज’मध्ये अभिनेता म्हणून त्यांचं ट्रेनिंग सुरू करण्यात आले.

देविका राणी यांनी त्यांना सांगितंल, की ‘युसूफ तुम्हाला मी लवकरच अभिनेता म्हणून लाँच करू इच्छिते. त्यासाठी तुमचं स्क्रिन नेम बदलणं, ही कल्पना आहे. असं नाव ज्याने संपूर्ण जग तुम्हाला ओळखेल आणि प्रेक्षक तुमची रोमँटिक इमेज त्या नावाशी जोडू शकतील. दिलीप कुमार हे नाव चांगलं आहे.’ परंतु देविका यांच्या नाव बदलण्याच्या विचाराशी ते सहमत नव्हते. यावर देविका म्हणाल्या कि, स्क्रिन नेम चांगलं असल्यास एक सेक्यूलर अपील होईल, असंही देविका यांनी सांगितलं. यावर विचार करुन दिलीप कुमार या नावासाठी त्यांनी सहमत दर्शवली आणि आज हे अनेकांच्या मनात अधिराज्य गाजवत आहे.

१९४४ साली ज्वार भाटा या चित्रपटाद्वारे बॉलीवूड कारकिर्दीची सुरवात करणारे दिलीप कुमार हे बॉलीवूडचे पहिले सुपरस्टार म्हणून ओळखले जातात. देवदास, मुगल-ए-आझम, राम और श्याम, गंगा जमुना यासारखे अनेक सुपरहीट चित्रपटात त्यांनी अभिनय केला आहे. कारकीर्दीच्या दुसऱ्या टप्प्यात  दिलीप कुमार यांनी क्रांती, सौदागर, कर्मा यासारख्या चित्रपटात भूमिका केल्या. १९९८ साली आलेला किला हा त्यांचा अखेरचा चित्रपट ठरला.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!