Share

एक वैचारिक जनआंदोलन म्हणजे ‘काँग्रेस’- भूपेश बघेल

Published On: 

🕒 1 min read

नवी-दिल्ली : भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा आज(२८ डिसें.) स्थापना दिवस आहे. २८ डिसेंबर १९८५ ला याची स्थापना झाली असून आज तब्बल १३७ वर्ष पूर्ण झाली आहेत. देशभरात आजचा दिवस काँग्रेस स्थापना दिवस म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल(Bhupesh Baghel) यांनी एक वैचारिक जनआंदोलन म्हणजे ‘भारतीय राष्ट्रीय काँग्रेस’, असे म्हणत शुभेच्छा दिल्या आहेत.

यासंदर्भात भूपेश बघेल यांनी ट्विट केले असून ट्विटमध्ये ते म्हणाले आहेत की,’भारताची कल्पना स्वतःमध्ये आत्मसात करत, विविधतेत एकतेचा सुगंध पसरवणारा , एक वैचारिक जनआंदोलन म्हणजेच ‘भारतीय राष्ट्रीय काँग्रेस’, या आज १३७ व्या स्थापना दिनानिमित्त, लोकशाहीप्रती आपली बांधिलकी आणि वचनबद्धतेचा आपण अभिमान बाळगू या.’ तसेच अभिमानाने सांगा! आम्ही काँग्रेस आहोत, असेही बघेल म्हणाले आहेत.

दरम्यान, मुंबईतील गोपालदास संस्कृत कॉलेज मैदान येथे २८ डिसेंबर १९८५ रोजी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची स्थापना झाली. ज्याचे प्रथम अध्यक्ष व्योमेशचंद्र बनर्जी होते. तसेच याच पार्श्वभूमीवर आज नवी दिल्ली येथे स्थापना दिवस निमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी तसेच खासदार राहुल गांधी उपस्थित होते.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!