🕒 1 min read
मुंबई : भाजप नेते दिवंगत गोपीनाथ मुंडे(Gopinath Munde) यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे(Pankja Munde) यांनी एक संकल्प करण्याचा मनोदय जाहीर केला असून यासाठी त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना उद्देशून एक भावनिक पत्र देखील लिहिले आहे.
पत्रामध्ये पंकजा म्हणाल्या आहे की,’१२ डिसेंबर, २ जून आणि दसरा हे दिवस आपण विसरू शकत नाही. या तिन्ही दिवशी कोणत्याही निमंत्रणाशिवाय तुम्ही गडावर येत असता, आमच्यावर अलोट प्रेम करता हे विसरता येणार नाही. गोपीनाथ गडावर आतापर्यंत अनेक जण येवून गेले, अनेक दुःखी कुटुंबांना गोपीनाथ गडावरून मदत करता आली त्या सर्वांचे आशीर्वाद मिळाले, हे आशीर्वाद चुकीच्या गोष्टी सुधारण्यासाठी असतील, हे आशीर्वाद धगधगती मशाल तेजस्वी ठेवण्यासाठी असतील.’ तसेच १२ डिसेंबरला एक संकल्प करण्याचा मनोदय देखील यावेळी त्यांनी व्यक्त केला आहे. हा संकल्प पूर्ण करणार का असा सवाल त्यांनी या पत्रातून आपल्या कार्यकर्त्यांना विचारला आहे. परंतु हा संकल्प काय असणार हे या पत्रात स्पष्ट करण्यात आलेले नाही.
— Pankaja Gopinath Munde (@Pankajamunde) December 8, 2021
यापूर्वी ओबीसी आरक्षणावरून पुन्हा एकदा राज्य सरकारवर निशाणा साधत पंकजा म्हणाल्या होत्या की,’ओबीसी आरक्षणाचा अध्यादेश सुप्रीम कोर्टाने स्थगित केला आहे. त्यामुळे जोपर्यंत ओबीसी वर्गाला राजकीय आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत सरकारने निवडणुकांना स्थगिती द्यावी. विशेष अधिवेशन घेऊन आधी ओबीसीच्या आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावावा आणि त्यानंतरच निवडणुका घ्याव्यात.’
महत्वाच्या बातम्या:
- केवळ लष्करच नव्हे, तर अवघा देश या धक्कादायक घटनेमुळे हादरला आहे- राज ठाकरे
- बिपीन रावत यांच्या दुर्दैवी मृत्यूने संपूर्ण देश विषण्ण झाला- मुख्यमंत्री ठाकरे
- बिपीन रावत यांची संरक्षण क्षेत्रातील सेवा कायम लक्षात राहील- शरद पवार
- ‘त्यांच्या निधनामुळे मला…’, बिपीन रावत यांच्या निधनावर पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला शोक
- …त्यांनी केलेली भारतमातेची सेवा राष्ट्र कायम स्मरणात ठेवेल- देवेंद्र फडणवीस
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
