Share

…त्यांनी केलेली भारतमातेची सेवा राष्ट्र कायम स्मरणात ठेवेल- देवेंद्र फडणवीस

Published On: 

मुंबई : काल(८ डिसें.)तामिळनाडूमधील जंगलामध्ये भारतीय हवाई दलाच्या हेलिकॉप्टरचा भीषण अपघात झाला. जंगलात हे हेलिकॉप्टर कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. अपघातग्रस्त हेलिकॉप्टरमधून १४ जण प्रवास करत होते. त्यात भारताचे सीडीएस बिपिन रावत(Bipin Rawat) हे सुद्धा होते. भारतीय वायुसेनेने हेलिकॉप्टर अपघातात सीडीएस जनरल बिपिन रावत यांच्यासह १२ जण शहीद झाल्याचे माहिती दिली आहे. यावरच देशभरातून शोक व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस(Devendra Fadanvis) यांनी ट्वीट करत या घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे.

देवेंद्र फडणवीस आपल्या ट्विटमध्ये म्हणाले आहेत की,’अतिशय दुःखद, भयंकर आणि अत्यंत वेदनादायक! आम्ही आमचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ सीडीएस जनरल बिपिन रावत जी यांना तामिळनाडूमध्ये एका दुर्दैवी अपघातात गमावले. मनापासून शोक. या प्रचंड आणि कधीही भरून न येणार्‍या नुकसानाबद्दल देश शोक करत आहे. जनरल बिपिन रावत जी यांनी त्यांच्या दीर्घ कारकिर्दीत विविध भूमिका आणि जबाबदाऱ्या पार पाडून देशाची सेवा केली. अनेक मोहिमांमध्ये त्यांनी भारताचे प्रतिनिधित्वही केले. मातब्बर जनरल बिपीन रावत जी यांना माझी विनम्र श्रद्धांजली आणि विनम्र अभिवादन.त्यांची भारतमातेची सेवा राष्ट्र कायम स्मरणात ठेवेल!ॐ शांति’

दरम्यान, या हेलिकॉप्टरमधून बिपिन रावत वेलिंग्टनच्या डिफेंस स्टाफ कॉलेजमध्ये जात होते. या महाविद्यालयात बिपीन रावत यांच लेक्चर होतं. या कार्यक्रमानंतर ते दिल्लीला रवाना होणार होते. कुन्नूर इथल्या घनदाट जंगलात हेलिकॉप्टरचा अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की अपघात झाल्याच्या चारही बाजूंनी आगीचे लोळ दिसत होते. हेलिकॉप्टर दुर्घटनेची माहिती मिळताच तिथे रेस्क्यू ऑपरेशन करण्यात आले. तसेच मिळालेल्या माहितीनुसार या हेलिकॉप्टरमध्ये सीडीएस जनरल बिपिन रावत, मधुलिका रावत, बिपिन रावत यांच्या पत्नी, ब्रिगेडियर एल. एस. लिद्दर, लेफ्टनंट कर्नल हरजिंदर सिंह, नायक गुरसेवक सिंह, नायक जीतेंद्र कुमार, लांस नायक विवेक कुमार, लांस नायक बी साई तेजा, हवालदार सतपाल हे होते.

महत्वाच्या बातम्या:

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!