Share

Breaking : महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊन ? राज्य मंत्रिमंडळाची आज दुपारी 3 वाजता तातडीची बैठक

Published On: 

मुंबई : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असून शहरी भागासह ग्रामीण भागातही कोरोना रुग्णांची संख्या प्रचंड वेगाने वाढत आहे. कोरोनाचा रुग्णांचा वाढता आकडा लक्षात घेता चिंता व्यक्त केली जात आहे. सरकारकडून देखील राज्यातील काही भागामध्ये कडक निर्बंध लावण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी सवांद साधला. महाराष्ट्रात कोरोनाचा उद्रेक होत असल्याने, लॉकडाऊनचा धोका टळलेला नाही असं मुख्यमंत्री म्हणाले. कोरोनाच्या उद्रेकामुळे महाराष्ट्र लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर आहे. अशीच ररुग्णवाढ सुरु राहिली तर पुढील १५ दिवसांत हॉस्पिटले तुडुंब भरून जातील. असेही ते यावेळी म्हणाले होते.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गेल्या दोन दिवसांत राज्यातील अनेक मान्यवरांशी चर्चा करत राज्यातील लॉकडाऊन लावायचा की निर्बंध कडक करायचे यावर चर्चा केली आहे. त्यानंतर आता याच पार्श्वभूमीवर आज दुपारी ३ वाजता राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. या बैठकीत सर्व मंत्री ऑनलाईन उपस्थित राहणार आहेत. लॉकडाऊन आणि कोरोनाची परिस्थिती यासंदर्भात निर्णय घेण्यासाठी ही बैठक बोलावली आहे.

दरम्यान, राज्यात शनिवारी दिवसभरात ४९ हजार ४४७ नवे रुग्ण आढळले आहेत. राज्यात आज दिवसभरात ३७ हजार ८२१ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. राज्यात दिवसभरात २७७ रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत ५५ हजार ५६५ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. कोरोना बधीतानाची ही आकेदेवारी मनात धडकी भरवणारी असल्याने राज्यात तातडीने निर्णय घेणे अपेक्षित आहे. त्यामुळे आजच्या बैठकीत काय निर्णय होतो याकडे राज्याचे डोळे लागले आहेत.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!