🕒 1 min read
मुंबई: शिवसेनेच्या नेत्या मनीषा कायंदे (Shiv Sena leader Manisha Kayande) यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस ( Devendra Fadnavis wife Amruta Fadnavis) यांना चांगलाच टोला लगावला आहे. अमृता फडणवीस यांनी काल (३० जानेवारी) नामर्द, बिगडे नवाब आणि नन्हें पटोले म्हणत महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांवर टीका केली होती. यावरच मनीषा कायंदे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
“अमृता फडणवीस यांना वर्षा बंगला सोडावा लागला त्यामुळे त्या फ्रस्टेशनमध्ये गेल्याने तसे बोलत आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी असल्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांना तोंड दाबून बुक्क्याचा मार सहन करावा लागत आहे. त्यांनी जनतेत येऊन काम करावं, भाजपने त्यांना प्रवक्ता जाहीर करावं.”असा टोला मनीषा कायंदे यांनी लगावला आहे.
दरम्यान यावेळी मनीषा कायंदे यांनी पेंग्विनच्या (Penguin case) मुद्द्यावरही प्रतिक्रिया दिली आहे. सध्या पेंग्विनवरून आणि त्यावर होणाऱ्या खर्चावरून भाजपने शिवसेनेला निशाण्यावर धरले आहे. यावरच मनिषा कायंदे यांनी भाजपवर जोरदार पलटवार केला आहे. “मुंबईतील पेंग्विन सेक्शन आहे, तो मुंबई महानगरपालिका चालवते आणि अहमदाबाद महानगरपालिकेचे पेग्विन पार्क कंत्राटदार चालवत आहेत. आणि तिथला प्रत्येक प्राणी पाहण्यासाठी वेगळी तिकीट आकारली जात आहेत. त्यामुळे मुंबईच्या महापौर यावर अधिक प्रकाश टाकतील आणि पोलखोल करतील” असे मनीषा कायंदे यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या:
- औंरगाबादेत बॅनर लावून बायको पाहिजे म्हणणाऱ्यावर अखेर गुन्हा दाखल
- “अशोक गर्ग MAGPIE ग्रुपने संजय राऊत कुटुंबाला भागीदारी दिली?”, किरीट सोमय्य्यांचा सवाल
- “शेतकऱ्यांना आता गांजा पिकवण्याची देखील परवानगी द्यावी”, भाजप खासदाराचा संताप
- ३१ जानेवारी ‘विश्वासघात दिवस’ म्हणून साजरा करणार-राकेश टिकैत
- राज्यात अनेक प्रश्न असून सरकारला केवळ मद्यविक्रीत रस- नवनीत राणा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
