🕒 1 min read
औरंगाबाद : ‘आझादी का अमृत महोत्सव’ या अंतर्गत २६ ऑक्टोबरपासून शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यात आजपासून १ ते ३ ऑक्टोबर या कालावधीत कॅनॉट प्लेस येथे सकाळी ७ ते १० या वेळेत झुंबाचे आयोजन करण्यात आलेले आहे. याचबरोबर मनोरंजनात्मक कार्यक्रम, कला प्रदर्शने, लाईव्ह संगीत, विविध प्रकारच्या कार्यशाळा या कार्यक्रमांचे देखील यात आयोजन करण्यात आले आहे. औरंगाबादकरांनी या कार्यक्रमांमध्ये भाग घेत आस्वाद घ्यावा असे आवाहन मनपा प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.
३० सप्टेंबर रोजी महानगरपालिका प्रशासक आस्तिक कुमार पांडेय यांच्या संकल्पनेनुसार विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. यात औरंगाबाद शहरातील घनकचरा प्रक्रिया केंद्र येथील कचऱ्यापासून खत निर्मिती प्रक्रियेची माहिती नागरिकांपर्यंत पोहचण्यासाठी पडेगाव कचरा प्रक्रिया केंद्र येथे नागरिकांसाठी क्षेत्र भेट आयोजित करण्यात आली होती.
शुक्रवारी कॅनॉट येथे २४ तासांसाठी जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. याबरोबरच पार्किंग व्यवस्था, ओपन स्ट्रीट, रिकाम्या जागा पुन्हा डिझाइन करणे, समाजीकरणासाठी मोकळ्या जागा विकसित करणे, दिव्यांग नागरिकांसाठी सुविधाजनक फुटपाथ बनवणे, सामुदायिक सहभागाने भिंती रंगवणे यासारखे उपक्रम राबवण्यात येणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘त्या’ उद्यानाला ‘साध्वी सावित्रीबाई फुले’ नाव देणाऱ्यांचा हेतू चांगला होता- प्रा. हरी नरके
- आनंदवार्ता: गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा राज्यातील जीएसटी संकलनात २२ टक्क्यांची वाढ
- शिवसेनेच्या खेळीमुळे काँग्रेसचा रिव्हर्स गिअर; पालिकेसाठी आघाडी करण्याचे थोरातांचे संकेत
- पंतप्रधान मोदींनी केले ‘या’ काँग्रेस नेत्याचे कौतुक
- आनंदवार्ता: गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा राज्यातील जीएसटी संकलनात २२ टक्क्यांची वाढ

