Share

तुमच्या पक्षातील ‘सत्यवादी’ घोटाळेबाज लवकरच महाराष्ट्रासमोर आणु, मिटकरींचा पाटलांना इशारा

Published On: 

मुंबई – राज्यात अनेक वर्षापासून भाजप-शिवसेना युती होती. मात्र, 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेनेने भाजप सोबतची युती तोडली. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेस या तीन पक्षांनी महाविकास आघाडी करुन राज्यात सरकार स्थापन केले.

दरम्यान, मागील काही दिवसांपासून राज्यात घडत असलेल्या घटनांमुळे महाविकास आघाडी सरकर अडचणीत आले आहे. या पार्श्वभूमीवर आगामी काळात ठाकरे सरकार पडेल आणि भाजप पुन्हा एकदा फोडाफोडी करून सरकार स्थापन करणार असल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरु झाली आहे. परंतु आगामी काळातील सरकार स्थापनेबाबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मोठे आणि विधान केले आहे.

पाटील म्हणाले की, राज्यामधील राजकीय वाटचालीबाबत आम्ही धोरण निश्चित केले आहे. आता आम्हाला राज्यात कुणाच्याही कुबड्या नको आहेत. आम्ही यापुढे स्वबळावर निवडणुका लढवणार. २०२४ मध्ये दोन कोटी मतांचा टप्पा ओलांडण्याचे लक्ष्य आम्ही ठेवले आहे. तसेच आम्हाला कुणाच्याही कुबड्या नको आहेत. आम्ही स्वबळावर निवडणून लढवून २०२४ मध्ये सरकार स्थापन करू, असा गाढा विश्वास चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला. यावेळी त्यांनी महाविकासआघाडी सरकार हे त्यांच्या कर्माने मरेल, अशा शब्दांत हल्लाबोल केला. तसेच येत्या आठ दिवसांत ठाकरे सरकारमधील तिसऱ्या मंत्र्याला राजीनामा द्यावा लागेल, असा गर्भित इशाराही चंद्रकांत पाटील यांनी दिला.

दरम्यान, पाटील यांच्या याच वक्तव्याचा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे आमदार अमोल मिटकरी यांनी समाचार घेतला आहे.स्वमुखाने सरकार पडत नसल्याची कबुली दिली तर! सोबत 2024 ची नवीन डेडलाईन देऊन टाकली . फक्त तुमच्या पक्षाची नैतिक बाजु भविष्यात सांभाळून ठेवणे.कारण अनेक घोटाळे व तुमच्या पक्षातील ‘सत्यवादी’ घोटाळेबाज लवकरच महाराष्ट्रासमोर आणु. काकांसहित!!असे मिटकरी यांनी म्हटले आहे.

मिटकरी पुढे म्हणाले, राफेल घोटाळ्यात 10 लाख युरो खाऊन भ्रष्टाचार करणाऱ्या काकांना पदावर राहण्याचा अधिकार आहे का? हे 105 पुतण्यांणी सांगावं व नंतर नैतिकतेच्या गप्पा कराव्यात.कालपासून पत्रकार परिषदा घेत राजा हरिश्चंद्रासारखा सत्यतेचा आव आणणाऱ्यांनी स्वतःची नैतिकता तपासावी असा टोला देखील त्यांनी लगावला आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!