पुणे: थोड्याच वेळात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची पुण्यात सभा सुरु होणार आहे. तत्पूर्वी मनसे नेते गजानन काळे यांनी मविआ सरकारमधील नेत्यांवर चांगलाच निशाणा साधला आहे. राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांना त्यांनी चांगलेच सुनावले आहे.
“मविआ सरकारमधील राष्ट्रवादीचे सर्वानीच नाव ठेवलेले मटणकरी, मी जरा वेगळ नाव ठेवलं आहे त्याचं. काही म्हटलं की ते हे पाटणदर आहे का, ते पाटणदर आहे? असे विचारतात. त्यामुळे ते थ्री इडियट्स सिनेमामधील सायलेन्सर आहेत.”, असा टोला गजानन काळे यांनी लगावला आहे.
यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला. “नए नए मुख्यमंत्री ने अपने ड्रायव्हरसे कहा, आज कार हम चलाएंगे..ड्रायव्हर बोला, हम उतर जाएंगे, चलाकर तो देखिए..आप की आत्मा हिल जाएगी. यह कार है, सरकार नहीं जो भगवान के भरोसे चल जाएगी.”, अशी शायरी म्हणत त्यांनी चांगलाच टोला हाणला.
महत्वाच्या बातम्या:
- “मनसेत काही पार्ट टाईम जॉबवाले आहेत, त्यांच्याकडून…” ; राज ठाकरेंच्या सभेपूर्वी वसंत मोरेंचा गौप्यस्फोट
- ‘भूल भुलैया २’ जोरात, ‘धाकड’ची परिस्थिती ‘बिकट’! कंगना म्हणाली…
- Raj Thackeray : सभेपूर्वी पुण्यात वसंत मोरेंची बाईक रॅली
- झारीतील शुक्राचार्य नक्की कोण?; राज ठाकरेंच्या सभेपूर्वीच वसंत मोरेंचा ‘बिग ब्लास्ट’
- पुण्यात राज ठाकरेंची आज सभा होणार; स्थानिक पोलिसांनी घातल्या ‘या’ अटी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

