मुंबई: महाराष्ट्र नवनीर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thakrey) यांची काल (१ मे ) औरंगाबद येथे सभा पार पडली. या सभेत राज ठाकरे यांनी पुन्हा मशिंदीवरील भोंग्यांचा मुद्दा उपस्थित केला. तसेच त्या मशिदिंवरील भोंगे उतरवले नाही तर हनुमान चालिसा वाजवण्याचा इशारा दिला. ४ तारखेपर्यंत भोंगे ऐकून घेणार नाही, असा इशारा देत त्यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधला. यावरच राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी ट्वीट करत चांगलेच सुनावले आहे.
महाराष्ट्र सुजाण आहे. कुणी कितीही आदळउपट केली तरी या राज्यात जातीय दंगली भडकणार नाहीत. हिंदु मुस्लिम ही सद्भावना कायम ठेवणाऱ्या या महाराष्ट्राला धर्मांध लोकांपासून वाचवण्याची आज खऱ्या अर्थाने गरज आहे. https://t.co/HdP55Vz4Ho
— आ. अमोल गोदावरी रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) May 1, 2022
“महाराष्ट्र सुजाण आहे. कुणी कितीही आदळउपट केली तरी या राज्यात जातीय दंगली भडकणार नाहीत. हिंदु मुस्लिम ही सद्भावना कायम ठेवणाऱ्या या महाराष्ट्राला धर्मांध लोकांपासून वाचवण्याची आज खऱ्या अर्थाने गरज आहे.”, असे ट्वीट अमोल मिटकरी यांनी केले आहे. यासोबतच त्यांनी एक व्हिडिओही पोस्ट केला आहे. ज्यात नाना पाटेकर दिसून येत आहे. ‘क्रांतिवीर’ या चित्रपटातील एक सीन अमोल मिटकरी यांनी पोस्ट केला आहे.
काय म्हणाले होते राज ठाकरे?
“शरद पवार यांना हिंदू या शब्दाचीच अॅलर्जी आहे. शरद पवार प्रत्येकवेळी भाषणात बोलताना शाहू, फुले आणि आंबेडकर यांचे नाव घेतात. महाराष्ट्र हा शाहू, फुले आणि आंबेडकरांचा आहेच. पण त्याआधी महाराष्ट्र हा शिवछत्रपतींचा आहे. शाहू, फुले आणि आंबेडकर हे शिवाजी महाराजांचाच विचार घेऊन पुढे गेले”.
“शरद पवार शिवाजी महाराजांचे नाव कधी घेत नाहीत, हे मी सांगितल्यानंतर सगळे बोलायला लागले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सभेत शिवाजी महाराजांचा फोटो नसतो. आता मी बोलल्यानंतर राष्ट्रवादीच्या व्यासपीठावर छत्रपतींची प्रतिमा दिसायला लागली. मी ‘जात’ मानत नाही. मला जातीशी देणेघेणे नाही. मी याठिकाणी ब्राह्मणांची बाजू घेण्यासाठी उभा नाही”, असेही राज ठाकरे म्हणाले.
महत्वाच्या बातम्या:
- “…तर दुसऱ्याला भाऊ मुख्यमंत्री झाल्याचं दुःख”, राज ठाकरेंच्या भाषणानंतर राष्ट्रवादीची प्रतिक्रिया
- “…तर जीभ आम्हालाही आहे”; राज ठाकरेंच्या भाषणानंतर इम्तियाझ जलील यांचा इशारा
- IPL 2022 SRH vs CSK : धोनीच्या नेतृत्वाचा विजयारंभ..! चेन्नईची हैदराबादवर १३ धावांनी मात
- “मी याठिकाणी ब्राह्मणांची बाजू घेण्यासाठी उभा नाही” – राज ठाकरे
- “रामदास स्वामी कधी म्हणाले, ते शिवाजी महाराजांचे गुरु आहेत” – राज ठाकरे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

