पुणे : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज लोकसभेत सन 2021-22 साठी केंद्रीय अर्थसंकल्प सादर केले. केंद्रीय अर्थसंकल्पात विविध क्षेत्रांसाठी मोठमोठ्या घोषणा करण्यात आल्या असून विरोधकांनी मात्र या अर्थसंकल्पावर सडकून टीका केली आहे. तर दुसरीकडं, भाजप नेत्यांनी या अर्थसंकल्पावर सविस्तर भाष्य करत समर्थन केलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी केंद्र सरकारने महाराष्ट्रासोबत दुजाभाव केल्याची टीका केली आहे. ‘महाराष्ट्राबद्दल केंद्र सरकारच्या मनात किती आकस आहे हे आजच्या अर्थसंकल्पातुन अख्या राज्याला दिसून आले. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी महाराष्ट्र सरकारचे थकलेले GST चे थकबाकी असलेल्या 35 हजार कोटीबाबत चकार शब्दही काढला नाही.’ असं टीकास्त्र मिटकरींनी सोडलं आहे.
महाराष्ट्राबद्दल केंद्र सरकारच्या मनात किती आकस आहे हे आजच्या अर्थसंकल्पातुन अख्या राज्याला दिसून आले. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी महाराष्ट्र सरकारचे थकलेले GST चे थकबाकी असलेल्या 35 हजार कोटीबाबत चकार शब्दही काढला नाही.
— आ. अमोल गोदावरी रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) February 1, 2021
अजित पवारांचे सर्वपक्षीय खासदारांना आवाहन !
‘आज केवळ अर्थसंकल्प मांडला गेला आहे. तो मंजूर होण्यासाठी महाराष्ट्रातील सर्वपक्षीय खासदारांनी आवश्यक सुधारणा सूचवून महाराष्ट्रावरचा अन्याय दूर करावा, महाराष्ट्रातील जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत, असं माझं आवाहन आहे. मुंबई-कन्याकुमारी महामार्गासाठी ६४ हजार कोटींची तरतूद स्वागतार्ह आहे, ही तरतूद अर्थसंकल्पाच्या पानांवरुन प्रत्यक्षात उतरणंही तितकंच महत्वाचं आहे,’ असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पावर सविस्तर भाष्य केलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘हिंदू समाज हा पूर्णपणे सडला आहे’ ; एल्गार परीषेदेत शरजिल उस्मानी याच वादग्रस्त विधान
- रस्त्याचे काम वेगात करण्यात अडचण काय? पोलीस आयुक्तांनी सुनावले
- ‘ आजचा अर्थसंकल्प म्हणजे देश विक्रीची “लूट लो इंडिया स्कीम” ‘
- देशाला भकास करणारा व विश्वासघात करणारा अर्थसंकल्प ! – हुसेन दलवाई
- शेतकऱ्यांनी पुढे येऊन मुद्द्यांवर बोलावं ; मोदी सरकार चर्चेला तयार : निर्मला सीतारामन
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

