नवी दिल्ली : क्रिकेट जगतातील सर्वोत्तम फिरकी गोलंदाजांपैकी एक असलेला ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार शेन वॉर्न (Shane Warne) याने यावेळी क्रिकेटविश्वातील टॉप फलंदाजांची नावे सांगितली आहेत. मात्र, विराट कोहलीचे (Virat Kohli) नाव त्याच्या टॉप 3 फलंदाजांच्या श्रेणीत समाविष्ट नाही. अलीकडेच बीसीसीआयने भारताच्या एकदिवसीय संघाचे कर्णधारपद रोहित शर्माकडे सोपवले आहे. यापूर्वी विराट कोहली टीम इंडियाचे वनडे आणि कसोटी कर्णधारपद सांभाळत होता. शेन वॉर्नच्या मते, ऑस्ट्रेलियाचा स्टीव्ह स्मिथ हा कसोटी क्रिकेटसाठी सर्वोत्तम फलंदाज आहे.
शेन वॉर्नने एका कार्यक्रमात बोलताना टॉप पाच फलंदाजांची नावे सांगितली आहेत. कसोटी क्रिकेटमधील कर्णधारपदाबद्दल बोलताना शेन वॉर्नने ऑस्ट्रेलियाचा स्टीव्ह स्मिथ टॉप-5 च्या यादीत पहिल्या क्रमांकावर असल्याचे म्हंटले आहे. या यादीत भारताचा कसोटी कर्णधार विराट कोहलीच्या नावाचाही समावेश आहे. फॉक्स क्रिकेटने इंस्टाग्रामवर शेन वॉर्नचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये वॉर्नने टेस्ट फॉरमॅटमध्ये सर्वात जलद 7000 धावा पूर्ण करणाऱ्या स्टीव्ह स्मिथला अव्वल स्थान दिले आहे.
इंग्लंडचा कर्णधार जो रूटला कसोटी क्रिकेटच्या यादीत वॉर्नने दुसरे स्थान दिले आहे. रूटने या वर्षात 6 शतके ठोकली. ऍशेस मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात जो रूटने दुसऱ्या डावात ८९ धावा केल्या. असे असतानाही ब्रिस्बेनमध्ये संघाला 9 गडी राखून पराभव स्वीकारावा लागला. रूटनंतर तिसऱ्या क्रमांकावर न्यूझीलंडचा केन विल्यमसन आहे. वॉर्नने भारताचा कसोटी कर्णधार विराट कोहलीला चौथा क्रमांक दिला आहे.
माजी ऑस्ट्रेलियन क्रिकेटर म्हणाला की विराट कोहली त्याच्या यादीत खाली घसरला आहे. कारण गेल्या वर्षभरात त्याने कोणतीही मोठी धावसंख्या उभारलेली नाही. कोहलीने 2019 मध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत शेवटचे शतक झळकावले होते. नुकत्याच झालेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत त्याला ५० धावांचा टप्पाही गाठता आला नाही.
https://www.instagram.com/p/CXVEahbsV3M/?utm_source=ig_web_copy_link
ऑस्ट्रेलियाच्या मार्नस लॅबुशेनने वॉर्नची टॉप-5 यादी पूर्ण केली. वॉर्न म्हणाला, ‘विराट कोहलीनंतर मार्नस माझ्या टॉप-5 लिस्टमध्ये येतो.” 26 डिसेंबरपासून दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळल्या जाणार्या कसोटी मालिकेत विराट कोहली टीम इंडियाचे नेतृत्व करणार आहे. या आठवड्याच्या सुरुवातीला, बीसीसीआयने घोषित केले की, आतापासून रोहित शर्मा वनडे आणि टी-20 चे कर्णधारपद स्वीकारेल. या घोषणेने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.कोहली (विराट कोहली) आताही कसोटी क्रिकेटमध्ये कर्णधारपद भूषवताना दिसणार आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘रोहित शर्मा एक जबरदस्त कर्णधार’
- महाराष्ट्र आणि बंगालमध्ये ‘ईडी’,’सीबीआय’सारख्या यंत्रणा करतात भाजपासाठी काम
- कॅ.अमरिंदर यांना बदलले नसते तर पंजाबमध्ये काँग्रेस संपली असती- राहुल गांधी
- आज होणारी म्हाडाची परीक्षा ढकलली पुढे; मध्यरात्री ट्विट करत जितेंद्र आव्हाडांनी दिली माहिती
- ‘सरकारने पवार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांचं वाटोळ करण्याचा संकल्प केला’

