औरंगाबाद :बँकांना झालेल्या नुकसानीमुळे सरकारने बँकांना ३ लाख कोटी दिले. आणि या नुकसानीमुळेच बँकांच्या खासगीकरणाचा विचार समोर आला आहे. देशाबाहेर पळून गेलेल्या लोकांना कर्ज दिल्यामुळे बँकांना अशा प्रकारचा तोटा सहन करावा लागला. हेच कर्ज सर्वसामान्यांना दिले असते तर बँकांवर आज ही वेळ आली नसती. उद्योजक राम भोगले यांनी सार्वजनिक बँकांचे खाजगीकरण करण्याची भूमिका मांडली. मात्र यावेळी आमंत्रित केलेल्या शहरातील एकाही लोकप्रतिनिधीने बँकांच्या खासगीकरणाला विरोध करण्यासाठी हजेरी लावली नाही. त्यामुळे याबाबत लोकप्रतिनिधींची उदासीनता दिसून आली.
लोकसभेच्या हिवाळी अधिवेशनात ‘बँकिंग कायदा दुरुस्ती विधेयक २०२१’ मांडण्यात येणार आहे. हे विधेयक मंजूर झाल्यास सरकारला तीन सार्वजनिक बँकांचे खाजगीकरण करण्याचा मार्ग खुला होणार आहे. याच पार्श्वभूमीवर या निर्णयास विरोध करण्यासाठी जनचळवळ उभारण्याकरीता यूएफबीयूच्या वतीने राज्यातील १० शहरात जन सुनवाई घेण्यात येणार आहे. याची सुरुवात शनिवारी (दि.११) औरंगाबादेतील पहिल्या जन सुनवाईद्वारे झाली. यावेळी उपस्थित असलेल्या विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आपले विचार मांडले. उद्योजक राम भोगले यावेळी बोलतांना म्हणाले, बँकांचे खाजगीकरण करण्यात यावे, यावर भर दिला.
ते म्हणाले की, मुळात सार्वजनिक बँकाच्या व्यवस्थापनात सरकारने स्वतंत्र संचालक नेमावे, त्यांना निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य द्यावे व बँकांनी आरबीआयचे सर्व नियम पाळावे तरच बँक तोट्यात जाणार नाही. ती सार्वजनिक असो वा खाजगी बँक काही फरक पडत नाही. व्यापारी वर्गाचे प्रतिनिधी अजय शहा यांनी खाजगीकरणाचे धोके लक्षात घेता बँक खाजगीकरण करतांना सरकारने अधिक गंभीर विचार करायला हवा असा इशारा दिला. खासगीकरणामुळे भ्रष्टाचार देखील वाढीस लागू शकतो असेही ते म्हणाले. भारतीय अर्थव्यवस्थेपुढील आव्हाने गरिबी, दारिद्र्य, विषमता, अविकसित शेती लक्षात घेता त्यावर मात करण्यासाठी बँकिंग सार्वजानिक क्षेत्रातच असले पाहिजे कारण खासगी क्षेत्र फक्त आणि फक्त नफ्यासाठी काम करते, असे मत पी.बी. अंभोरे यांनी मांडले.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘आज गोपीनाथ मुंडे असते तर भाजपसोबत युती कायम राहिली असती’
- ‘रोहित शर्मा एक जबरदस्त कर्णधार’
- जयंत पाटलांकडून शरद पवारांना वाढदिवसाच्या करेक्ट बाराच्या ठोक्याला शुभेच्छा
- शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे मेगा जॉब फेयरचे आयोजन
- ‘शिखर धवन लवकरच पुनरागमन करेल’, माजी क्रिकेटपटूने व्यक्त केला विश्वास
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
