मुंबई : राज्यातील सत्ता नाट्याचा अखेर शेवट झालाय. मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे तर उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली. देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पद स्वीकारून त्याग केला असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळामध्ये होत्या. याच पार्श्वभूमीवर भाजपचे आमदार संजय कुटे यांनी एक खळबळजनक विधान केले आहे.
राज्यातील सत्तांतराचे खरे सूत्रधार देवेंद्र फडणवीस होते असा खुलासा करत बाळासाहेब ठाकरे यांचे खरे वारसदार देखील देवेंद्र फडणवीस आहेत असे विधान केले आहे. “महाराष्ट्राच्या इतिहासातील हे ऐतिहासिक सत्ता नाट्य होतं यामध्ये देवेंद्र फडणवीस या सर्व यशाचे सूत्रधार होते. त्यानंतर जे घडलं त्यामुळे भाजपातले काही लोक नाराज झाले असतील. पण फडणविसांसारखा त्याग मूर्ती असलेला नेता या महाराष्ट्राला मिळाला याच आम्ही भाग्य समजतो” असं देखील संजय कुठे माध्यमांशी बोलताना म्हणाले.
त्याबरोबरच सत्तेसाठी आम्ही हे केलेलं नाही. ज्या विचारांवर आम्ही जगतोय त्याला गेल्या अडीच वर्षात तडा जात होता. यामुळे हिंदुत्वाचे विविध विषय मागे पडत होते. २०१९ मध्ये फडणवीसांच्या नेतृत्वाखाली शिवसेना-भाजपचं सरकार लोकांनी निवडून दिलं होतं ते हिंदुत्ववादी सरकार कोणत्याही परिस्थितीत पुन्हा याव आणि हा विचार पुढे जावा यासाठी फडणवीस यांनी मोठा त्याग केला असल्याचा दावा भाजपा आमदार संजय कुटे यांनी यावेळी केला.
“जेव्हा सत्तांतराच्या घडामोडी घडत होत्या त्यावेळी त्या कोणालाही माहीत नव्हत्या. पुढील काही तासात काय घडणार आहे हे कोणालाही माहीत नव्हतं. त्यामुळे जेव्हा फडणवीस मुख्यमंत्री होणार नाहीत हे कळालं तेव्हाही भावना उफाळून आली की असं कसं झालं? त्यामुळे भाजपच्या आमदारांनी केंद्रीय नेतृत्वाकडे विचारणा केली की, फडणवीस नसतील तर हे कसं काय होईल? पण फडणवीसांनी ठरवलं होतं की मी सत्तेत राहणार नाही. मी २०२४ च्या निवडणुकीसाठी तयारी करेन. पण भाजपचे खासदार ,आमदार यांनी केंद्रीय नेतृत्वाकडे याबाबत तक्रार केल्यानंतर त्यांनी आदेश दिले. तुमचं नेतृत्व मोठं आहे. पण एक कार्यकर्ता म्हणून तुम्हाला तिथे गेलेच पाहिजे हा आदेश केंद्रीय नेतृत्वांकडून त्यांना देण्यात आला. त्यामुळे त्यांच्या इच्छेविरुद्ध फडणवीसांना हे पद स्वीकारावं लागलं आणि सत्तेत सामील व्हावं लागलं” असा खुलासा संजय कुटे यांनी यावेळी केला.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

