मुंबई : गृहमंत्री अमित शहा यांनी एका वृत्तपत्राला विशेष मुलाखत दिली होती. त्यात त्यांना राज्यातील ठाकरे सरकार किती दिवस चालेल असा सवाल करण्यात आला होता. त्यावर शहा यांनी थेट उत्तर दिलं. शिवसेनेने आमच्या सोबत निवडणूक लढवली होती. शिवसेना हा आमचा छोटा मित्र पक्ष होता. त्यांनी आम्हाला मुख्यमंत्रीपदावर दावा करण्याची मोकळीक दिली होती. हे सरकार त्यांच्या ओझ्यानेच कोसळेल, असा आमचा विश्वास आहे. आम्हाला काहीही करावं लागणार नाही, असं यावेळी शाह म्हणाले होते.
गेल्या काही दिवसांपासून विविध मुद्द्यांवरून राज्य आणि केंद्र सरकार एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करणाऱ्याची संधी सोडताना दिसत नाहीत. कोरोनाची परिस्थिती गंभीर होत चालली आहे. रेमडेसिवीर, ऑक्सिजन, बेड्स यांची कमतरता जाणवत आहे. यातच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी महाविकास आघाडीवर टीका केली होती. या टीकेला प्रत्युत्तर देण्यात आले असून, महाविकास आघाडीला अपवित्र युती म्हणणारे अमित शाह म्हणजे ब्रह्मदेव नाहीत, असा जोरदार पलटवार करण्यात आला आहे.
राज्याचे गृहनिर्माणमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड पत्रकारांशी बोलत होते. महाविकास आघाडीतील तीनही पक्षांनी कुंभमेळ्यात तुमच्याप्रमाणे अंघोळ करून कोरोनाचा संसर्ग फैलावण्यास मदत केली नाही. आता केवळ कुंभमेळ्यात अंघोळ न केल्यामुळे आम्हाला अपवित्र ठरवले जात असेल तर आम्हाला ते चालेल, असा चिमटा आव्हाडांनी शाह यांच्या वक्तव्यावर काढला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- तन्मय प्रकरणी अमृता फडणवीस मैदानात, म्हणाल्या..
- योगी सरकारला ‘सर्वोच्च’ दिलासा, हायकोर्टाच्या ‘त्या’ आदेशाला स्थगिती
- नागपूरसाठी १० हजार रेमडेसिवीर पाठवा, हायकोर्टाचे ठाकरे सरकारला आदेश
- कुंभमेळ्यातून परतणाऱ्या भाविकांना क्वॉरन्टाइन करा, एमआयएमची मागणी
- ‘महाविकास आघाडी नव्हे, हे तर महाकन्फ्यूज सरकार’, चित्रा वाघ यांचा हल्लाबोल

