🕒 1 min read
लातूर : लातूर जिल्ह्यात अतिवृष्टी आणि नदीकाठी वाढलेल्या पाण्यामुळे झालेल्या नुकसानीची लातूर जिल्हा काँग्रेस पथकाने पाहणी करावी. गावकरी, आपदग्रस्त यांना दिलासा द्यावा, अशा सूचना पालकमंत्री अमित देशमुख यांनी दिल्या आहेत. आपदग्रस्त ग्रामस्थ शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी जिल्हा काँग्रेस पथकाने पुढाकार घ्यावा, नुकसानीची पाहणी करावी, झालेल्या नुकसानी संदर्भात प्रशासनाला माहिती कळवावी अशा सूचना पालकमंत्री देशमुख यांनी दिल्या आहेत.
काँग्रेस पक्षाकडून यासाठी प्रदेश सरचिटणीस आमदार धीरज देशमुख, अशोक पाटील निलंगेकर, राजेश्वरराव निटुरे, आणि अमर खानापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली विधानसभा मतदारसंघनिहाय पथके तयार करण्यात आली आहेत. प्रशासनाच्या वतीनेही त्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करावेत, त्या कामी काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी त्यांना सहकार्य करावे असेही त्यांनी म्हटले आहे .
राज्यातील महाविकास आघाडीचे शासन कोणत्याही प्रसंगात जनतेसोबत असून आपदग्रस्तांना तातडीने मदत देण्यास वचनबद्ध आहे. त्यामुळे कोणीही काळजी करू नये, असे आवाहनही त्यांनी केले. प्रशासन आणि जलसंपदा विभागाने धरणातून पाणी सोडताना नदीकाठच्या गावांना पूर्वकल्पना द्यावी, शेतकऱ्यांना सावध करावे त्याचबरोबर शेतकऱ्यांनीही नदीपात्रात जाऊ नये, आपली जनावरे शेती अवजारे सुरक्षित ठिकाणी न्यावीत, नदीला पूर आलेला असताना पुलावरुन पाणी वाहत असताना त्याठिकाणी पोहण्याचे किंवा वाहने नेण्याचे कोणीही धाडस करू नये, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- भाजप ठाकरे सरकारचा ‘बाल बाका’ करू शकणार नाही; राऊतांचे खडेबोल
- औरंगाबादेत शिवसेनेच्या माजी महापौरांच्या कन्येची कौतुकास्पद कामगिरी, युपीएससी परिक्षेत ५१९ वा रँक!
- तो आवाज माझा नाहीच हे विरोधकांचे कारस्थान; सुनिल कांबळेंचे स्पष्टीकरण
- गुलाब चक्रीवादळाचा राज्यावरही परिणाम; दोन दिवस मुसळधार पावसाचा इशारा
- वरती सत्तेत एकत्र, पण खाली कार्यकर्त्यांची डोके फोड सुरूच- विजय शिवतारे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
