Share

Ambadas Danave | “शिंदे गटाचा जल्लोष तात्पुरत्या स्वरूपाचा आहे अन् …”

Published On: 

पुणे : एकनाश शिंदे यांनी भाजपसोबत युती करून राज्यात सरकार स्थापन केलं. या सत्तासंघर्षानंतर शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट यांच्यात शिवसेना नेमकी कोणाची यावरून वाद खूप पेटले होते. काल याप्रकरणावर सर्वोच्य कोर्टात सुनावणी पार पडली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या गटाने न्यायालयात शिवसेनेचे निवडणूक चिन्ह तसेच पक्षावरील वर्चस्व ठरवण्यापासून निवडणूक आयोगाला रोखावे, अशी मागणी करणारी याचिका दाखल केली होती. परंतू सुनावणीमध्ये एकनाथ शिंदे यांच्या कडून निकाल लागला आणि ठाकरेंनी दाखल केलेली याचिका न्यायालयाकडून फेटाळण्यात आली.या प्रकरणावर राज्यातील अनेक राजकीय नेत्यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. अशातच ठाकरे गटाचे नेते आणि विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी एक वक्तव्य केलं आहे.

काय म्हणाले अंबादास दानवे ?

आज पार पडलेल्या सुनावणीमध्ये न्यायालयाने जो निकाल दिला. त्यावरून शिंदे गट आनंदी आहे. परंतू शिंदे गटाचा जल्लोष तात्पुरत्या स्वरूपाचा आहे. खरं यश शिवसेनेला मिळेल, असं म्हणत अंबादास दानवे यांनी शिंदे गटाला टोला लगावला आहे. दानवे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर अपेक्षाभंग झालेला नाही, आम्हाला न्याय मिळेल, असा विश्वासही त्यांनी याठिकाणी व्यक्त केला.

उद्धव ठाकरे यांच्या विचारांचीच खरी शिवसेना –

पुढे बोलतना ते असंही सांगितले की, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या विचारांची हीच खरी शिवसेना आहे. शिंदे गटातील आमदार शिवसेनेच्या माध्यमातून निवडून आले आहेत. त्यांना निवडणुकीसाठीचा अर्ज देखील उद्धव ठाकरेंच्या आदेशानेच देण्यात आला होता.

तसेच, त्या बंडखोर 40 आमदारांनी गद्दारी केली. तर शिवसेना सोडून द्यायची होती. त्यांन मनसे, प्रहार किंवा भाजपात प्रवेश करायचा होता. मात्र दुसऱ्या पक्षात विलीन व्हायचं नसेल, ते अपात्र ठरतील. मग, राज्यात निवडणुका जाहीर होती, यासाठी शिवसैनिकांनी तयार राहिलं पाहिजे, असंही दानवे म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!