Share

#Bihar : नितीशकुमारांच्या जेडीयूला मागे टाकत भाजपने घेतली मोठी आघाडी

Published On: 

पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार आहे. 243 जागांसाठी तीन टप्प्यांमध्ये मतदार पार पडल्यानंतर आज मतमोजणी होणार आहे. नितीश कुमार आणि तेजस्वी यादव यांच्यासह 3733 उमेदवारांच्या भवितव्याचा फैसला आज होणार आहे. कोरोना काळातील ही सर्वात मोठी निवडणूक आहे. राज्यात मतमोजणीसाठी 38 जिल्ह्यांमध्ये 55 मतमोजणी केंद्र स्थापन करण्यात आले आहेत.

नितीश कुमार पुन्हा सत्तेत येणार की तेजस्वी यादव विजय मिळवणार हे आज स्पष्ट होईल. बिहारमध्ये 28 ऑक्टोबर, 3 नोव्हेंबर आणि 7 नोव्हेंबर अशा तीन टप्प्यात मतदान झालं होतं. सर्व टप्प्यांमध्ये झालेल्या मतदानाची आज मोजणी होणार आहे. यानंतर पुढील पाच वर्षांत बिहारची सत्ता कोणाकडे जाणार हे ठरणार आहे. बिहार राज्य निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार पूर्व चंपारण, सीवान, बेगुसराय आणि गयामध्ये प्रत्येकी तीन तर नालंदा, बांका, पूर्णिया, भागलपूर, दरभंगा, गोपालगंज, सहरसामध्ये प्रत्येकी दोन मतमोजणी केंद्र बनवले आहेत.

सुरुवातीच्या कलानुसार पहिल्या काही फेऱ्यांमध्ये तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखालील महागठबंधन आघाडी घेतली होती मात्र आता . तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखाली महाआघाडीचा आकडा कमी होताना दिसत असून, एनडीचा आकडा वाढू लागला आहे.सुरुवातीच्या काही फेऱ्यांमध्ये महाआघाडीने मोठी बढत घेतली होती. मात्र, महाआघाडी व एनडीए यांच्यात अटीतटीची लढत होताना दिसत आहे.

नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढत असलेल्या एनडीएने देखील दमदार मुसंडी मारायला सुरुवात केली आहे. आतापर्यंत ११८ जागांवर एनडीएने आघाडी घेतली आहे तर महागठबंधन आघाडी ११६ जागांवर आघाडी घेतली आहे. नितीशकुमार हे मुख्यमंत्री असतील अशी घोषणा जरी भाजपने केली असती तरीही नितीशकुमार यांच्या पक्षा पेक्षा भाजपने अधिक जागांवर आघाडी घेतली आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!