नवी दिल्ली : पंजाब मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर नाराज असणारे काँग्रेस नेते कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी दिल्ली येथे बुधवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. त्यानंतर आता पुढच्या पंजाब विधानसभा निवडणुकीपूर्वी ते भाजपामध्ये जाणार अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. परंतू सध्या तरी यावर कोणताही निर्णय घेतला नसल्याचे सिंग यांनी सांगितले आहे.
कारण आपण भाजपात सामील होणार नसल्याचं सिंग यांनी स्पष्ट केलंय. एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले, ‘आतापर्यंत मी काँग्रेसमध्ये आहे, पण मला ज्याप्रकरची वागणूक दिली जात आहे, ते पासून मी काँग्रेसमध्ये राहणार नाही. ५० वर्षांनंतर माझ्या विश्वासार्हतेवर शंका घेतली जात असून ते असहनीय आहे. ज्या प्रकारे आमदारांची बैठक बोलवून ऐनवेळी मला माहिती दिली गेली, मी तेव्हाच पद सोडत असल्याचे स्पष्ट केले होते. जर कोणाला माझ्यावर विश्वास नसेल तर माझ्या पदावर असण्याचा काय फायदा, असेही ते म्हणाले.
कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर काँग्रेसने मुख्यमंत्रिपदासाठी दलित उमेदवार चरणजीत सिंग चन्नी यांची निवड केली. त्यानंतर काही दिवसांतच नवज्योतसिंग सिद्धू यांनी पंजाब काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला. तर कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘मुख्यमंत्र्यांनी मदत जाहीर करूनच मराठवाड्यात यावे’, आ.राणा पाटलांचा हल्लाबोल
- ‘इथेच पाप केलं तर इथेच पापं भोगावी लागतील’, मनसेचा राष्ट्रवादीला टोला
- वराती मागून घोडे नाचवून काहीच उपयोग नाही; दरेकरांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल
- देवेंद्र फडणवीस, प्रविण दरेकर मराठवाडा व विदर्भाचा दौरा करणार
- ‘मुख्यमंत्री किती मिनिटांचा मराठवाडा दौरा करतात हे पाहावे लागेल’, मनसेचा टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

