🕒 1 min read
मुंबई : शिंदे गटाने भाजप पक्षासोबत युती करून सरकार स्थापन केल्यापासुन सध्या महाराष्ट्र राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच ढवळून निघालं आहे. तेव्हापासून शिंदे सरकारवर विरोधी पक्षनेत्यांकडून आरोप केले जात आहेत. अशातच ‘शिवछत्रपती’ संघटनेचे नेते अमर देशमुख यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हल्ला केला आहे.
मुख्यमंत्र्यांकडे पण बडवे आहेत-
जसे पहिल्या मुख्यमंत्र्यांकडे बडवे होते तसे या मुख्यमंत्र्यांकडे पण बडवे आहेत, असं म्हणत अमर देशमुख यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. काल 25 ऑगस्ट रोजी गुरुवारी संध्याकाळी मराठा आरक्षण व अन्य मागण्यांच्या बाबतीत बोलण्यासाठी सह्याद्री अतिथीगृहात मराठा समाजाच्या संघटनांच्या नेत्यांची बैठक बोलवण्यात आली होती. बैठकीनंतर अमर देशमुख यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.
बैठकीनंतर अमर देशमुख नाराज-
या बैठकीमध्ये एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिंदे सरकारमधील इतर नेते असून, मराठा समाजाची बैठक बोलवली तर शेवटच्या घटकालाही बोलता आलं पाहिजे, असंही अमर देशमुख यांनी त्यावेळी म्हटलं.
मराठा आरक्षणासंदर्भात काही चर्चाच झाली नाही-
मराठा आरक्षण व अन्य मागण्यांच्या बाबतीत बैठकीमध्ये मराठा आरक्षणासंदर्भात काही चर्चाच झाली नसून आपण या बैठकीनंतर समाधानी नसल्याचं अमर देशमुख यांनी सांगितलं आहे. तसेच त्यांनी मुख्यमंत्र्यांनी आणखी एक फक्त आरक्षणावर बैठक बोलवावी, नाहीतर पुन्हा एकदा घेऊन मोर्चे काढण्याचा इशाराही देशमुख यांनी दिला आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Uddhav Thackeray | बहुमत असुनही मोदी सरकार शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना घाबरते- शिवसेना
- Shivsena । भाजपाचे बहुमत निखळ नाही, ते चोरलेले आहे; शिवसेनेचा हल्लाबोल
- Ajit Pawar | शिंदे सरकारला मान्यता मिळाल्यास लोकशाहीला धोका- अजित पवार
- Winter Session | तारीख ठरली! या वर्षीचं हिवाळी अधिवेशन होणार ‘या’ तारखेला
- Supriya Sule | …म्हणून दादा, आम्हाला नेहमीच तुमचा अभिमान वाटतो- सुप्रिया सुळे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
