लातूर: जिल्ह्यात गेल्या महिन्यापेक्षा रुग्णांच्या संख्येत कमालीचा फरक दिसून येत आहे. चार अंकी असलेली रुग्णांची संख्या आता तीन अंकी झाली आहे. रुग्णांची संख्या कमी होत आहे मात्र मृत्यू दर कायम आहे. कोरोना रुग्णांची वाढत्या संख्येला काही प्रमाणात आळा बसत असला तरी महत्वाचं म्हणजे मृत्यूदर कमी होणं गरजेचं आहे. मंगळवारी ३९९ कोरोना बाधित रुग्णांची भर पडली असून ३१ जणांचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे.
जिल्ह्यात मंगळवारी १०६९ रूग्ण कोरोनावर मात करून सुखरूप आपापल्या घरी गेले आहेत. ही चांगली बातमी असली तरी आता मृत्यू दर तसेच कोरोना बाधितांची संख्या कमी होणे आवश्यक आहे. मंगळवारी आरटीपीसीआर टेस्टमधून १०७ तर रॅपिड अँटिजेन टेस्टमधून २९२ असे एकूण ३९९ रूग्ण पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले. गेल्या महिन्यापेक्षा आता कोरोनाबाधीतांचा आकडा कमी येत आहे, मात्र अजूनही कोरोनाचे संकट गेले नाहीये.
मंगळवारी आरटीपीसीआर एकूण टेस्ट ५४९ तर रॅपिड अँटिजेन टेस्ट २५५७ झाल्या. एवढ्या टेस्टमधून ३९९ रूग्ण पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले. मंगळवारी ३१ रूग्ण कोरोना विषाणूची लागण होऊन दगावले. जिल्ह्यात आतापर्यंत १८३३ रूग्ण कोरोनाने दगावले आहेत. एकूण कोरोना प्रभाव काळात जिल्ह्यात ८५ हजार ६८४ रूग्ण पॉझिटिव्ह आढळून आले असले तरी यातील उपचाराने ७८ हजार १०१ रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.
महत्वाच्या बातम्या
- बॉल टेम्परींग प्रकरणात आता स्टुअर्ट ब्रॉडने घेतली उडी; केले ‘हे’ वक्तव्य
- पतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यासाठी पोलीस अधिकाऱ्याने घेतली लाच
- ‘ही वेळ मोर्चे काढण्याची नाही, आपण जगलो तर मराठा आरक्षणासाठी लढा देऊ शकतो’
- ‘तिसऱ्या लाटेसाठी बाल रुग्णालयांनी सज्ज राहावे’, पृथ्वीराज बी.पी. यांचे आवाहन
- पृथ्वी शॉला आगामी विश्वचषकात खेळवायला हवे, आकाश चोप्राने केली मागणी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
