Share

‘देशातल्या जवळपास सगळ्याच चळवळी संपल्यात जमा’, राजू शेट्टींनी व्यक्त केली नाराजी

Published On: 

🕒 1 min read

नवी-दिल्ली : माध्यमांशी संवाद साधतांना माजी खासदार राजू शेट्टी यांनी देशातल्या जवळपास सगळ्याच चळवळी संपल्यात जमा आहेत. केवळ कामगार आणि शेतकरी चळवळ धग धरून उभी आहे. ही पण चळवळ संपवण्याचा घाट घातला जात आहे. देश खासगीकरणाच्या विळख्यात घालवण्यासाठी या चळवळ संपवण्याचं कारस्थान सुरू आहे’, असे म्हणत टीका केली आहे.

यावेळी बोलतांना ते म्हणाले की,’समान्यांना आधारवड असणाऱ्या सरकारी कंपन्या एकापाठोपाठ एक विकण्याचा सपाटा सुरू आहे. एअर इंडिया विकली आता कधी ही बीएसएनएलचा नंबर लागू शकतो. ही खुली व्यवस्था मक्तेदारीला चालना देणारी आहे. हे मोडून काढण्याची टाकत फक्त चळवळी मध्ये आहे, त्यामुळे आपसातले मतभेद आणि इझम विसरून देशभरातील सर्व चळवळी एकत्र करूया.’

दरम्यान, काही दिवसांपूर्वी शेट्टी यांनी राज्य तसेच केंद्र सरकारविषयीची नाराजीही व्यक्त केली होती. यासंदर्भात बोलतांना ते म्हणाले होते की,’शेतकऱ्यांविषयीचे प्रश्न हाताळण्यात दोन्ही सरकारं कमी पडत आहेत, असंही ते म्हणाले होते. राज्यातील ३०-३५ साखर कारखान्यांना एकरकमी एफआरपी द्यायला जमतं तर सहकारमंत्र्यांनाच काय अडचण? आणि कायद्याने एकरकमी एफआरपीचा हक्क असताना तो डावलला जात असेलतर तसे करणारे साखर कारखाने का सुरू होऊ द्यावेत असे प्रश्न स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी उपस्थित केले. ऊसउत्पादकावर अन्याय झाल्यास ऊस गळीत हंगाम जोमात असताना तो बंद पाडू’,असा इशाराही शेट्टी यांनी दिला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!