🕒 1 min read
मुंबई : महाराष्ट्रात ‘धनुष्यबाण’ अर्थात शिवसेनेच्या निवडणूक चिन्हावरची लढाई दीर्घकाळ चालण्याची शक्यता आहे. कागदपत्रे सादर करण्यासाठी निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे गटाला आणखी 15 दिवसांची मुदत दिल्याचे वृत्त आहे. यापूर्वी असे वृत्त होते की उद्धव ठाकरे गटाने या प्रकरणाची सुनावणी चार आठवडे तहकूब करण्याची मागणी केली होती. त्याचवेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाने निवडणूक आयोगाकडे कागदपत्रे सादर केली आहेत.
निवडणूक आयोगाने ठाकरे गटाला कागदपत्रे सादर करण्यासाठी आणखी 15 दिवसांची मुदत दिली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आयोगाने ठाकरे गटाला 23 ऑगस्टपर्यंतची मुदत दिली आहे. गेल्या महिन्यात आयोगाने शिवसेनेच्या दोन्ही गटांना 8 ऑगस्टपर्यंत त्यांच्या दाव्याचे समर्थन करणारी कागदपत्रे सादर करण्यास सांगितले होते.
उद्धव ठाकरे गटाने मागितला होता ४ आठवड्यांचा कालावधी-
या प्रकरणाची सुनावणी 4 आठवडे पुढे ढकलण्याच्या मुद्द्यावर आयोगाने सध्या फक्त संबंधित कागदपत्रे मागवली असून त्यानंतर सुनावणी होणार असल्याचे वृत्त आहे. आयोगाच्या वतीने शिवसेनेच्या विधिमंडळ आणि संघटना स्तरावरील दोन्ही गटांकडून पाठिंब्याची पत्रे मागविण्यात आली होती. सोबतच त्यांना याप्रकरणी लेखी निवेदन देण्यासही सांगण्यात आले.
एकनाथ शिंदे आणि इतर 40 शिवसेना आमदारांचा एकत्र बंड-
जूनमध्ये शिवसेनेच्या एकनाथ शिंदे आणि इतर 40 आमदारांनी एकत्र बंड केला, त्यानंतर महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे सरकार पडले. महाविकास आघाडी सरकारमध्ये शिवसेनेशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचाही सहभाग होता. नंतर शिंदे गटाने भाजपसोबत सरकार स्थापन केले, ज्यामध्ये एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले. यानंतर एकनाथ शिंदे गटाने शिवसेना पक्ष, आणि निवडणूर चिन्ह धनुष्यबाणावर दावा केला आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Pankaja Munde | “तेवढी माझी पात्रता नसेल…” ; पंकजा मुंडेंच्या वक्तव्यामुळे राजकारण तापणार
- Pankaja Munde । कॉलेजमध्ये असताना तुम्हाला कुणी प्रपोज केलंय का?, पंकजा मुंडे म्हणाल्या…
- Pankaja Munde । विरोधीपक्षातील नेते फोडण्यात पंकजा मुंडेंचा मोठा हात!, “कबुली देत म्हणाल्या, होय मी…”
- Shiv Sena । “सोमय्या आम्ही सोडून बाकी सगळे घोटाळेबाज असा दावा करतायत, पण पी.एम.सी. बँक…”; शिवसेनेचा हल्लाबोल
- Shiv Sena | “भ्रष्ट नेत्यांना क्लिनचीट हेच मोदींचे ‘स्वच्छ भारत अभियान’ असेल तर अमृत महोत्सवात फडकणारा तिरंगाही शरमेने खाली झुकेल!”
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

