🕒 1 min read
मुंबई : ३८ दिवसांच्या प्रतीक्षेनंतर राज्यात अखेर मंत्रिमंडळ विस्तार झाला. शिंदे गटातील ९ आणि भाजपच्या ९ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. पण एरवी बाळासाहेब ठाकरे यांचे नाव घेणाऱ्या शिंदे गटातील आमदारांना शपथविधी सोहळ्यात मात्र बाळासाहेबांचा विसर पडला. कुणीही त्यावेळी त्यांचे नाव घेतले नाही. त्यावरून शिवसेनेने शिंदे गटावर चांगलीच टीका केली. त्यानंतर मात्र सर्व मंत्र्यांनी बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळाला भेट देऊन अभिवादन केले. त्यावरूनच आज शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांचे बंधू आणि आमदार सुनील राऊत यांनी शिंदे गटावर हल्लाबोल केला.
“शिंदे गटातील मंत्र्यांनी शपथ घेतली त्यावेळी कोणीही बाळासाहेबांचे नाव घेतले नाही. नाव तर सोडा पण त्यांचा साधा उल्लेख देखील केला नाही. जर त्यांना बाळासाहेबांबद्दल खरंच प्रेम असतं तर त्यांनी त्यांच्या नावाचा उल्लेख केला असता. ते म्हणतात कि आम्ही बाळासाहेबांशी निष्ठावान आहोत. त्यांना जर शिवसेना आणि बाळासाहेबांबद्दल एवढीच आस्था असती, निष्ठा असती तर शिवसेनेत फूट पाडून ते बाहेर गेले नसते. आम्ही तर आज बाळासाहेबांना उद्धव ठाकरेंच्या रूपात पाहतो. त्यामुळे त्यांनी उद्धवसाहेबांना ‘वर्षा’ निवासस्थान सोडायला भाग पाडलं नसतं. पण त्यांनी तसं केलं. मग हि कसली निष्ठा? हि निष्ठा नाही बोगस प्रेम आहे आणि त्यांचं हे प्रेम किती बोगस आहे हे जनतेलाही माहीत आहे.”, अश्या शब्दात त्यांनी शिंदे गटावर निशाणा साधला.
सूड घेणारचं
पुढे बोलताना सुनी राऊत म्हणाले कि, “शिवसेना हा पक्ष कोणी बांधला? शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी बांधला. त्यामुळे हि शिवसेना बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची आहे. त्यामुळे आम्हीच खरी शिवसेना आहोत, अशी नौटंकी बंद करा. आम्ही पुन्हा पक्ष बांधणी करत आहोत आणि ज्यांनी ज्यांनी उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावरून खाली खचले, त्यांचा आम्ही आमच्या पद्धतीने सूड घेणारचं”, असा कडक इशारा त्यांनी यावेळी दिला.
महत्वाच्या बातम्या:
- Pankaja Munde । विरोधीपक्षातील नेते फोडण्यात पंकजा मुंडेंचा मोठा हात!, “कबुली देत म्हणाल्या, होय मी…”
- Shiv Sena । “सोमय्या आम्ही सोडून बाकी सगळे घोटाळेबाज असा दावा करतायत, पण पी.एम.सी. बँक…”; शिवसेनेचा हल्लाबोल
- Shiv Sena | “भ्रष्ट नेत्यांना क्लिनचीट हेच मोदींचे ‘स्वच्छ भारत अभियान’ असेल तर अमृत महोत्सवात फडकणारा तिरंगाही शरमेने खाली झुकेल!”
- Jitendra Awhad । मोठी बातमी : जितेंद्र आव्हाडांना मानवाधिकार आयोगाची नोटीस!
- Ajit Pawar | ज्यांचे संख्याबळ जास्त असते त्यांचा विरोधी पक्षनेता असतो – अजित पवार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
