Share

कुस्ती स्पर्धांना परवानगी द्या, कुस्तीपटूंना आर्थिक मदत देण्याची मागणी

Published On: 

🕒 1 min read

परभणी : जिल्ह्यातील कुस्ती स्पर्धा बारा – तेरा महिन्यापासून पूर्णतः बंद झालेल्या आहेत. परिणामी, कुस्तीपटू आर्थिकदृष्ट्या अडचणीत आले आहेत. जिल्हा प्रशासनाने या परिस्थितीत कुस्ती स्पर्धांना परवानगी द्यावी तसेच कुस्तीपटूंना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी पैलवानांच्या एका शिष्ट मंडळाने जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले आहे.

शिवसेनेचे खासदार संजय जाधव यांच्या उपस्थितीत गुरुवारी जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांना जगदंब प्रतिष्ठाणच्या वतीने एक निवेदन दिले. त्यात जिल्हयातील यात्रा, उत्सवातून आयोजित होणाऱ्या कुस्ती स्पर्धा थांबल्या आहेत. पैलवानांवर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे. कोरोनाच्या संकटाने  वर्षभरापासुन कुस्ती मैदान तसेच कुस्तीच्या आयोजनावर बंदी घातली आहे. या मुळे पैलवान आर्थिक संकटात सापडले आहेत. खुराक आणि उदरनिवार्हासाठी खुप संघर्ष करावा लागत आहे. शासनाने यामध्ये लक्ष घालुन पैलवानांना आर्थिक मदत करावी, अशी मागणी या निवेदनाच्या माध्यमातून केली आहे.

जिल्ह्यातील विविध ग्रामदैवतांच्या यात्रेनिमित्त कुस्ती मैदानाचे आयोजन होत असते. या मैदानात कुस्ती खेळुन मिळणाऱ्या बक्षिसावर वर्षभर पैलवानांच्या खुराकाचा व इतर खर्चाची तजवीज करत असतात. गावोगावी यात्रा – जत्रा, महोत्सव हेच आजही पैलवानांच्या आर्थिक उत्पन्नाचे उत्पन्न मिळत नाही. पैलवान घडवण्यामध्ये लोकसहभाग, राजाश्रय महत्वाचा आहे. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभमीवर वर्षभरापासुन कुस्ती मैदान भरवण्यास बंदी घालली आहे. परिणामी पैलवान आर्थिक संकटात सापडले आहेत. काहीजणांवर उपासमारीची वेळ आली आहे. शहरात काही मोजक्याच तालमी अस्तित्वात आहेत.

तेथेही सराव करणाऱ्या पैलवानांची संख्या मोजकीच आहे. पैलवान होणे आत्ता सोपे राहिलेले नाही. आज खुराकाचा खर्च आवाक्याच्या बाहेर गेला आहे. महागाई वाढल्याने अनेकांनी कुस्ती खेळणे बंद केले आहे, असेही निवेदनात म्हटले आहे. या निवेदनावर खासदारांसह जगदंब प्रतिष्ठाणच्या सदस्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या   

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!