मुंबई : दोन महिन्यांपूर्वी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतल्याने मनसे-भाजप युती होणार का अशा चर्चांना जोर आला होता. जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुकीत मनसे-भाजप युती होण्याची दाट शक्यता आहे. पालघरमध्ये मनसे- भाजप युतीचा नारळ देखील फुटला आहे. यामुळे आता राज्यात भाजप मनसे संभाव्य युतीची जोरदार चर्चा चालू आहे.
यावर आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भाष्य केले आहे. याबाबत बोलताना ते म्हणाले कि, ‘युतीचा विषय हा कॉमन नाही. माझी आणि राज ठाकरे यांची भेट अचानक झाली. नाशिकमध्ये अचानक आम्ही ऐकमेकांच्या समोर आलो. जसे दोन हिंदू मानस चहासाठी भेटतात त्याप्रमाणे मी राज ठाकरेंना भेटलो. याचा मनसे आणि भाजपा युती होण्याचा काहीही सबंध नसतो.
युती ही स्थानिक ठिकाणच्या आवश्यकतेनुसार ठरत असते. मनसेसोबत राज्य स्तरावर, अखिल भारतीय स्तरावर युती ठरायला एक ऑथोरिटी असते. ती ऑथोरिटी याचा विचार करेल. पण एखाद्या जिल्ह्यात आवश्यकतेपोटी कोणाचीही कोणाशी युती होते. स्थानिक स्वराज्य संस्थांना काहीही बंधन नसतात. अनेक ठिकाणी भूतकाळात भाजपा-राष्ट्रवादी युती झालेली आहे. पालघर जिल्ह्यात झालेली युती स्थानिक आवश्यकता असेल म्हणून झाली याचा अर्थ हा आता कॉमन पॅर्टन झाला असे नाही.’ असे स्पष्ट मत चंद्रकांत पाटील यांनी यावर मांडले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- परमबीर सिंग यांना परदेशात पळून जाण्यासाठी केंद्र सरकारची मदत?; पटोलेंला शंका
- भाजीपाल्याची विक्री करणाऱ्या भुजबळांकडे २५ वर्षात २५ हजार कोटी कसे आले? आ. कांदेंचा सवाल
- वराती मागून घोडे नाचवून काहीच उपयोग नाही; दरेकरांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल
- पूरस्थितीला इसापूर धरण प्राधिकरणाचा हलगर्जीपणा जबाबदार; भाजपचा आरोप
- ‘मुख्यमंत्री किती मिनिटांचा मराठवाडा दौरा करतात हे पाहावे लागेल’, मनसेचा टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

