Share

विधानसभेनंतर युतीच ही बिगुल वाजणार,युतीबाबत संजय राऊतांनी केले सूचक विधान

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : अखेर विधानसभेचे बिगुल वाजले आहे. 21 ऑक्टोबरला राज्यात एकाच टप्यात मतदान होणार आहे. तर 24 ऑक्टोबरला निकाल जाहीर होणार आहे. त्यामुळे दिवाळीच्या आधीच विधानसभेचे फटाके वाजणार आहेत. असं सर्व काही नियोजित असले तरी भाजप शिवसेना युतीबाबत अद्याप संभ्रम आहे. मात्र शिवसेना खा. संजय राऊत यांनी युती होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे.

संजय राऊत म्हणाले की, निवडणुका आता जाहीर झाल्याचं आहेत. त्यामुळे युतीची घोषणा लवकरच होणार आहे. गेले काही दिवस युतीच घोंगड भिजत पडलं आहे. मात्र संजय राऊत यांनी सांगितल्या प्रमाणे युती निश्चित झाल्याचं दिसत आहे. त्यामुळे येत्या विधानसभेला भाजप शिवसेना युती करून लढणार असल्याचा विश्वास राऊतांच्या बोलण्यातून दिसत आहे.

दरम्यान शिवसेनेने लोकसभा निवडणुकी वेळीच भाजप समोर विधानसभेसाठी 50 – 50 चा फॉर्म्युला ठेवला होता. मात्र भाजप आणि शिवसेनेत झालेल्या अतिरिक्त भरतीमुळे दोन्ही पक्षाला जास्त जागांची गरज भासू लागली आहे. मात्र दोन्ही पक्ष तडजोड करण्यास तयार नसल्याने युतीत मिठाचा खडा पडणार असल्याच सांगितलं जातं होत. मात्र आता युती अटळ असल्याचं दोन्ही पक्षातील नेत्यांकडून सांगण्यात येत आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!