मुंबई : भारतीय संघानं दुसऱ्या टी-२० सामन्यामध्ये ऑस्ट्रेलियाचा पराभव करत मालिका आपल्या नावे केली. रोहित शर्मा, शामी आणि बुमराहसारख्या दिग्गज खेळाडूंशिवाय भारातानं हा विजय मिळवल्यामुळे सर्वांना सुखद धक्का बसला आहे. भारतीय संघाच्या विजयानंतर सलामिवीर फलंदाज रोहित शर्मानं ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे. रोहित शर्मानं आपल्या ट्विटमध्ये भारतीय संघाचं अभिनंदन केलं आहे.
या विजयासह टीम इंडियाने 2-0 च्या फरकाने मालिकाही जिंकली. कोरोनामुळे सामना पाहण्यासाठी क्रिकेट चाहत्यांना परवानगी देण्यात आली नव्हती. मात्र टीम इंडियाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी स्टेडियमच्या एकूण क्षमतेच्या 50 टक्के चाहत्यांना सामना पाहण्यासाठी परवानगी देण्यात आली.
यामुळे मोठ्या उत्साहात क्रिकेट चाहते सामन्याचा थरार अनुभवायला येतात. सामन्यादरम्यान अनेक गंमतीशीर घटना पाहायला मिळतात. अशीच एक गंमतीशीर घटना सामन्यात पाहायला मिळाली. या सामन्याला एक क्रिकेट चाहती एक फळक घेऊन आली होती. मी माझ्या पार्टनरला प्रत्येक चौकारावर किस (Kiss) करेन, असा आशयाचा हा फळक होता. सामन्याच्या पहिल्या डावातील 8 व्या ओव्हरदरम्यान या चाहतीवर कॅमेराची नजर पडली. त्यानंतर हा फोटो चांगलाच चर्चेत आला आहे.

महत्वाच्या बातम्या
- लोकशाही मार्गाने चालणाऱ्यांना देशद्रोही, नक्षलवादी ठरवले जात आहे : सचिन सावंत
- आज भीमसैनिकांनी आपल्या शिस्तीचे व संयमाचे दर्शन घडविले – उद्धव ठाकरे
- चैत्यभूमी येथे भव्य स्तूप उभारण्याची केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंची मागणी
- कोविडविरुद्धच्या लढ्यात भारताने केला ‘हा’ आणखी एक महत्त्वाचा टप्पा पार
- माझी नाव विधानसभा मतदार संघातील सर्वसामान्य जनताच पुढे ढकलत आहे : मुश्रीफ


