औरंगाबाद : सिल्लोड व सोयगाव तालुक्यातील ५६ तलाठी सजाच्या ठिकाणी तलाठी कार्यालयांना तसेच त्यांचे निवासस्थान बांधण्यास व दोन्ही तालुक्यात शासकीय कार्यालये एकाच ठिकाणी असावे यासाठी प्रशासकीय इमारत बांधण्यासाठी मंजुरी मिळाल्याची माहिती राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली आहे. यामुळे नागरिकांना सर्व सुविधा एकाच ठिकाणी मिळणार आहेत.
सिल्लोड- सोयगाव तालुक्यातील सुमारे ५६ ठिकाणी तलाठी कार्यालय तसेच तलाठ्यांचे निवासस्थान बांधण्यास मंजुरी मिळाली आहे. यासोबतच सिल्लोड आणि सोयगाव तालुक्यात प्रशासकीय भवनाच्या बांधकामासाठी मंजुरी मिळाली असुन, यंदाच्या अर्थसंकल्पात दोन्ही तालुक्यांना प्रत्येकी दहा याप्रमाणे वीस कोटींच्या निधीला मंजुरी मिळाली आहे.
तलाठी कार्यालय निवासस्थान व प्रशासकीय इमारत निर्मिती झाल्यास प्रशासकीय कामासाठी आलेल्या सर्वसामान्य जनतेला वेगवेगळ्या कार्यालयात फिरावे लागणार नाही. जनतेची ही पायपीट थांबविण्यासाठी राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी प्रयत्न केले आहे. त्यामुळे नागरिकांचा वेळ आणि पैसा दोन्हीही वाचणार आहे. तर सर्व सुविधा एकाच छताखाली नागरिकांना मिळणार आहे.
महत्वाच्या बातम्या
- MPSCने तारखा घोषित करताना सरकारला विश्वासात घेतलं नाही : वडेट्टीवार
- उमेदवारी अर्ज भरल्यानंतर कारचा दरवाजा ढकलल्याने ममतांच्या पायाला दुखापत
- मोहन डेलकर प्रकरणाच्या चौकशीच्या मागणीसाठी सुप्रिया सुळे यांनी घेतली ओम बिर्ला यांची भेट
- अमेरिका रिटर्न महिला सरपंच देते मुलीच्या जन्मानंतर महिलांना २ दोन महिन्यांचे वेतन
- वाझे यांच्याकडे अशी कोणती माहिती आहे की ज्यामुळे त्यांना वाचवलं जात आहे ?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

