Share

मी सादर केलेली सर्व कागदपत्रे खरी आहेत- नवाब मलिक

Published On: 

मुंबई: क्रुझ ड्रग्स आणि आर्यन खान प्रकरणात अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. यादरम्यान मी आतापर्यंत समीर वानखेडे यांच्यावर केलेल्या आरोपांवर ठाम आहे. वानखेडेंचा जन्माचा दाखला खोटा ठरल्यास मंत्रिपद सोडायला तयार आहे. मी केलेले आरोप खोटे ठरवून दाखवा. असे जाहीर आव्हानही मंत्री नवाब मलिक यांनी दिले आहे. आता आज ते पुन्हा एक पत्रकार परिषद घेत आहेत.

पत्रकार परिषदेत मंत्री नवाब मलिक यांनी म्हटले आहे की, मी ट्वीटवर सदर केलेली कागदपत्रे सर्व खरी आहेत. ती महानगरपालिकेकडून मिळालेली असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच समीर वानखेडे यांच्या निकाहनाम यातील दोन कॉलम मी रिक्त ठेवले असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. ज्यात डॉ. शबाना कुरेशी यांच्या वडिलांचे नाव आणि त्यांचा पत्ता आहे. कारण त्यांना धमकावले जात असल्याचेही नवाब मलिक यांनी म्हटले आहे.

दरम्यान दरम्यान ७ डिसेंबर २००६ रोजी मुंबई येथील लोखंडवाला कॉम्प्लेक्स मध्ये समीर वानखेडे आणि डॉ. शबाना कुरेशी निकाह केल्याचेही मलिकांनी म्हटले आहे. तसेच मेहेर म्याहणून ३३ हजार घेण्यात आले असेही त्यांनी म्हटले आहे. त्यांनी निकाहनामाचाही एक फोटो ट्वीट केला आहे. त्याबाबतच त्यांनी आज पत्रकार परिषदेत स्पष्टीकरण दिले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!