Share

चिपी विमानतळाच्या उद्धाटनानिमित्त सर्व पक्ष येणार एकत्र

Published On: 

मुंबई : सिंधदूर्गमधील चिपी विमानतळाच्या उद्धाटनाचा आज सोहळा पार पडणार आहे. दुपारी 1 वाजता या विमानतळाचे उद्धाटन होणार आहे. या विमानतळावरुन भाजप आणि शिवसेनेत मोठा श्रेयवाद सुरु आहे. या विमानतळावरुन भाजप-शिवसेनेत राजकीय शिमगा सुरु आहे. मात्र मंचावर कार्यक्रमाला गालबोट लागेल असं कोणतंच कृत्य आमच्याकडून होणार नसल्याचं राणेंनी सांगितलं. आजचा कार्यक्रम हा शिवसेना-भाजपच्या वादाची नांदी ठरण्याच्या दाट शक्यता आहेत.

चिपी विमानतळाच्या उद्धाटनाच्या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, केंद्रीय मंत्री नारायण राणे उपस्थित राहणार आहेत. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, भाजप, रिपाई, या सर्व पक्षांचे नेते या विमानतळाच्या उद्धाटन कार्यक्रमानिमित्त एकाच मंचावर पाहायला मिळणार आहेत.

सिंधुदुर्गातील बहुचर्चित चिपी विमानतळाच्या उद्घाटनाचा मुहूर्त अखेर ठरला. चिपी विमानतळाचे उद्घाटन आज 9 ऑक्टोबर रोजी दुपारी 12.30 वाजता नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. ज्योतिरादित्य शिंदे हे कार्यक्रमाला ऑनलाइन हजेरी लावणार आहेत.

कार्यक्रमासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्मंत्री अजित पवार, शिवसेना नेते सुभाष देसाई, विनायक राऊत, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, केंद्रीय मंत्री नारायण राणे, केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधीया, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, परिवहनमंत्री अनिल परब उपस्थित राहणार आहेत. दरम्यान ठाकरे-राणे-शिंदे एकाच व्यासपीठावर उपस्थित राहणार असल्याने कोकणासाठी आज मोठा दिवस आहे.

दरम्यान, समोर आल्यावर प्रहार करणार पण कार्यक्रमाला गालबोट लागू देणार नाही, असं नारायण राणे म्हणाले आहेत. नारायण राणे आणि उद्धव ठाकरे हे एका मंचावर आणि शेजारी शेजारी बसणार असून या कार्यक्रमामुळे राजकारणामध्ये काय मोठी घडामोड घडणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!