🕒 1 min read
नवी-दिल्ली : माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि अटल बिहारी वाजपेयी हे भारतीय लोकशाहीचे आदर्श नेते असून दोघेही मी माझ्या लोकशाहीचे सन्मानाचे पालन करीन असे म्हणायचे असे वक्तव्य केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांनी बुधवारी एका वृत्तवाहिनीच्या एका कार्यक्रमात केले आहे. तसेच यावेळी सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्षांनी आत्मपरीक्षण केले पाहिजे आणि सन्मानाने वागले पाहिजे असेही ते म्हणाले आहेत.
पुढे गडकरी म्हणाले की, ‘अटलजींचा वारसा आमची प्रेरणा आहे आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांचेही भारतीय लोकशाहीमध्ये मोठे योगदान होते’. तसेच यावेळी नुकत्याच संपलेल्या पावसाळी अधिवेशनात संसदेत झालेल्या गोंधळाविषयी भाष्य करत ते म्हणाले की, ‘अधिवेशनादरम्यान संसदेत तीन कृषी कायद्यांविरोधात, इंधन दरात वाढ आणि पेगॅसस स्पायवेअरवरुण दोन्ही सभागृहांमध्ये विरोधकांनी गोंधळ घातला होता. विरोधकांनी या मुद्द्यांवर सरकारकडे चर्चेची मागणी केली होती. त्यामुळे वारंवार सहागृह तहकूब करावे लागले होते.
‘सत्ताधारी पक्ष आणि विरोधकांना एकदा आत्मपरीक्षण करू द्या. कारण आज जो विरोधीपक्ष आहे तो उद्या सत्ताधारी असणार आहे. तर आजचा सत्ताधारी पक्ष उद्याचा विरोधी पक्ष असणार आहे. त्यामुळे आमच्या भूमिका बदलत राहतात असेही गडकरी म्हणाले.
दरम्यान, सत्ताधारी आणि विरोधकांना लोकशाहीची दोन चाके म्हणत गडकरी म्हणाले की, ‘ही लोकशाही यशस्वी करण्यासाठी सशक्त विरोधी पक्ष देखील आवश्यक आहे. नेहरूंनी वाजपेयीजींचा नेहमीच आदर केला आणि ते म्हणाले की विरोधी पक्ष देखील आवश्यक आहे. म्हणून काँग्रेस पक्ष विरोधी पक्ष म्हणून मजबूत झाला पाहिजे आणि विचारधारेच्या आधारावर त्यांनी जबाबदार विरोधकाचे काम केले पाहिजे, ही त्यांच्यासाठी माझी सदिच्छा आहे.”
महत्त्वाच्या बातम्या
- ‘पोलिसांचा फौजफाटा असूनही पहाटे पाचलाच पडळकरांची बैलगाडा शर्यत पार’
- ‘बैलगाडा शर्यतीनंतर पडळकरांची पहिली प्रतिक्रिया म्हणाले..’
- ‘गोमूत्र शिंपडणारे समोर आले असते तेच गोमूत्र कोल्ड्रिंग सारखं घशात घालून पुढे निघालो असतो’
- ‘ना खाऊंगा, ना खाने दूंगा’ हे भाजपने सिद्ध करावे; ACB धाड प्रकरणी काँग्रेसचं आव्हान
- “विधानसभेची निवडणूक होईल तेव्हा आशाताईंना आपण आमदार झालेले पाहू”
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
