अहमदाबाद : भारत विरुद्ध इंग्लंडच्या कसोटी मालिकेतील दुसरा कसोटी सामना १३ फेब्रुवारीपासून चेन्नईच्या मैदानावर खेळवला जात होता. पहिल्या सामन्यात पराभव पत्करावा लागल्याने हा सामना भारतासाठी अतिशय महत्वाचा होता. भारताने दुसऱ्या कसोटी सामन्यात दमदार विजय मिळवला. त्यांनतर आता आगामी तिसऱ्या सामन्याचे वेध लागले आहेत.
इग्लंड व भारतीय संघात सुरु असलेल्या कसोटी मालिकेचा दुसरा सामना भारतीय संघाने 317 धावांनी जिंकला.दुसऱ्या डावात अक्षर पटेलने इग्लंडचा निम्मा संघ माघारी धाडत विजयात मोठा वाटा उचलला. त्याने 60 धावा देत 5 बळी घेतले तर, आर अश्विनने देखील तीन बळी घेत महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली.
#TeamIndia for last Two Tests against England announced.@Paytm #INDvENG
— BCCI (@BCCI) February 17, 2021
Umesh Yadav will join the team in Ahmedabad and after his fitness assessment will replace Shardul Thakur, who will be released for Vijay Hazare Trophy.#INDvENG
— BCCI (@BCCI) February 17, 2021
दरम्यान, टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेतील तिसऱ्या आणि चौथ्या कसोटीसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. बीसीसीआयने ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. यामध्ये वेगवान गोलंदाज उमेश यादवचे कमबॅक झाले आहे.
Abhimanyu Easwaran, Shahbaz Nadeem and Priyank Panchal have been released for Vijay Hazare Trophy.#INDvENG
— BCCI (@BCCI) February 17, 2021
त्याच बरोबर यामध्ये बीसीसीआयने दिलेल्या माहिती नुसार टीम – विराट कोहली (कॅप्टन), रोहित शर्मा, मयंक अग्रवाल, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे (व्हीसी), केएल राहुल, हार्दिक पंड्या, वृषभ पंत (डब्ल्यूके), वृध्दिमान साहा (डब्ल्यूके), आर अश्विन, कुलदीप यादव, एक्झर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, इशांत शर्मा, जसप्रीत बुमराह, उमेश यादव अहमदाबादमध्ये संघात सामील होतील आणि तंदुरुस्तीचे आकलन झाल्यानंतर विजय हजारे ट्रॉफीसाठी सोडण्यात आलेल्या शार्दुल ठाकूरची जागा घेईल. समितीने पाच निव्वळ गोलंदाज आणि दोन खेळाडूंना स्टँडबाय म्हणून निवडले.नेट गोलंदाज: अंकित राजपूत, अवेश खान, संदीप वॉरियर, कृष्णाप्पा गौथम, सौरभ कुमार राखीव खेळाडूः के एस भारत, राहुल चहर. आदींचा समावेश असणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘मराठा आरक्षणाच्या केसमध्ये मुख्यमंत्रीसाहेब तुम्ही स्वतः लक्ष घालावं; हलगर्जीपणा करु नये’
- भले शाब्बास! औरंगाबादने ‘या’ गोष्टीत मोदींच्या वाराणसी व अहमदाबादलाही मागे टाकले
- आम्हीच श्रीरामांचे वंशज, भाजपला श्रीरामचंद्रांशी काही घेणं देणं नाही – राकेश टिकैत
- भाजपवर बांग्लादेशी अल्पसंख्यांकांना पद देण्याची नामुष्की आली?
- ‘राकेश टिकैत यांच्या आंदोलनाचे शेतकरी हिताशी काहीही देणे घेणे नाही’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

