लातूर : एकीकडे कोरोना आपला कहर दाखवत आहे, तर दुसरीकडे अवैध धंद्यांना ऊत आला आहे. त्यामुळे प्रशासनच्या चिंता काही प्रमाणात वाढ झाली आहे. विनापरवाना बेकायदेशीररित्या चोरटी दारू विक्री करण्याच्या उदेशाने बाळगुन वाहतूक करीत आसणारी कार सेंट्रल बँकेसमोर सोमवारी रात्री पोलिसांनी पकडली. कारसह एक लाख ४ हजार ५६० रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पांढऱ्या रंगाची कार मधून विनापरवाना बेकायदेशीर रित्या चोरटी दारू विक्री करण्यात येत असल्याची माहिती किनगाव पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे, सोमवारी रात्री ८.३० वाजता संबंधीत वर्णनाची कार, पोलिसांनी सेंट्रल बँकेसमोर पकडली. या कारमध्ये देशी दारूचे ९ बॉक्स एकूण ४३२ बाटल्या, अंदाजे किंमत ३४ हजार ५६० रुपये तर कारची किंमत ७० हजार रुपये असे एकून १ लाख ४ हजार ५६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पोलिसांनी त्यांच्याकडून १८० एमएलच्या १५ बाटल्या किंमत १२०० रु जप्त करून त्याच्याविरुद्ध पोहेकॉ. रामचंद गोखरे यांच्या फिर्यादीवरून, गुरनं ७८/२१ कलम ६५ (अ) (ई ) मदाका अन्वये मंगळवारी दुपारी गुन्हा दाखल केला, परंतू दारू विक्रेता पळून जाण्यात यशस्वी झाला.पोलिसांनी त्यांच्याकडून १८० एमएलच्या २२ बाटल्या किंमत १७६० रुपये जप्त करून त्याच्याविरुद्ध गुरन ७९/२१ कलम ६५ (अ) (ई) मदाका अन्वये मंगळवारी दुपारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दारू विक्रेता पळून जाण्यात यशस्वी झाला.
महत्त्वाच्या बातम्या
- धक्कादायक! जमिनीच्या लालसेपोटी पत्नीला संपवलं
- दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधाराची झाली निवड, अजिंक्य, पृथ्वी शॉ स्पर्धेतून बाहेर
- ‘लोकांनी बेदरकारपणा थांबवला नाही तर कडक पावले उचलण्याशिवाय पर्याय नाही’
- ना तुम जानो ना हम… दोन्ही संघांना टार्गेटच नाही कळलं
- शाब्बास लातूरकर! ९८ हजार जणांनी घेतली कोरोना प्रतिबंधात्मक लस
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

