Share

महाराष्ट्रासाठी धोक्याची घंटा ; आज कोरोना रुग्णांचा आकडा दहा हजारांपार

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : कोरोना रुग्णाचे प्रमाण कमी झाल्यानंतर हळूहळू लॉकडाऊनमध्ये शिथीलता करण्यात आली. त्यामुळे कोरोना संदर्भातील सर्व नियम पाळून भारतात सर्व काही पूर्ववत होत आहे. पण काही जण कोरोना संदर्भातील नियम पाळत नसल्यामुळे आता कोरोना रुग्णाचे प्रमाण वाढताना दिसत आहे.

राज्यात आज १०२१६ कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन ६४६७ कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण २०५५९५१ रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण ८८८३८ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता ९३.५२% झाले आहे.

राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ट्वीटरच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. कोरोनाची आकडेवारी वाढल्याने सरकारने खबरदारीची पावले उचलली आहेत. विविध राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे. तसेच आठ दिवस परिस्थितीवर लक्ष ठेवून लॉकडाऊनचा निर्णय घेतला जाणार आहे.

दरम्यान, महाराष्ट्रातील कोरोनाला वेळीच आवरण्यासाठी केंद्रानं उच्चस्तरीय समिती तयार केली आहे. ही समिती राज्यातील कोरोना नियंत्रित करण्यासाठी प्रयत्न करणार आहे.

महत्वाच्या बातम्या 

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!