Share

‘अक्षय कुमारकडे २ ते ३ वर्षच शिल्लक’;’या’ अभिनेत्याचं वक्तव्य

Published On: 

मुंबई : बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमार त्याच्या आगामी ‘राम सेतु’ चित्रपटाच्या तयारीत आहे. अक्षय कुमार हा १८ मार्च रोजी राम जन्मभूमि असलेल्या अयोध्येला जाऊन ‘राम सेतु’ या चित्रपटाचा शुभारंभ केला. यावेळी अक्षय सह चित्रपटातील इतर कलाकार देखील उपस्थित होते. यावेळी पूजा पाठ करून चित्रपटाचा शुभारंभ करण्यात आला.

मात्र या चित्रपटांवर अभिनेता कमाल आर. खान यानं निशाणा साधला आहे. कमाल आर खान उर्फ केआरके आपल्या वादग्रस्त वक्तव्यांसाठी प्रसिद्ध आहे. बॉलिवूडमधील घराणेशाही ते देशभरातील राजकारण अशा विविध विषयांवर तो रोखठोकपणे प्रतिक्रिया देतो.

यातच आता अक्षय कुमारवर निशाना साधत तो म्हणाला आहे की , ‘अक्षय कुमारच्या चित्रपटाचे हक्क खरेदी करण्यासाठी कोणी मिळत नाही. त्याचा सूर्यवंशी आणि बेलबॉटम चित्रपट प्रदर्शित होऊ शकत नाही. तो एकापाठोपाठ एक नव्या चित्रपटांची घोषण करतोय. कारण आता पैसे कमावण्यासाठी अक्षयकडे २ ते ३ वर्षच शिल्लक आहेत.

वेडे निर्माते त्याला चित्रपटासाठी १२५ कोटी रुपये देतात’ असा उपरोधिक टोला त्यानं लगावला आहे. सध्या सोशल मिडीयावर या ट्विटची चांगलीच चर्चा सुरु असून, अक्षयच्या चाहत्यांनी या ट्विटवर संताप व्यक्त केला आहे.

तसेच अक्षय कुमारचे येत्या काळात एक दोन नव्हे तर तब्बल चार चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. ‘सूर्यवंशी’, ‘बच्चन पांडे’, ‘बेलबॉटम’ आणि त्यानंतर ‘रामसेतू’ या चार धमाकेदार चित्रपटांच्या माध्यमातून तो प्रेक्षकांचं मनोरंजन करणार आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!