🕒 1 min read
औरंगाबाद : महिलांसाठी कायद्यात संविधानांत जी कर्तव्य आहेत, त्याची पुरेपूर माहिती महिलांना मिळावी यासाठी वेब साईट सुरु करण्याचा मानस बांधत लिंग भेद हा बालपणापासूनच मुला मुलींच्या मानसिकतेत नसावा यासाठी पुढाकार घेत अभिन्न उपक्रम पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी सुरु केला. त्याचे सकारात्मक परिणाम सध्या अनेक शाळा, महाविद्यालयात बघायला मिळत आहे. या कार्यासाठी त्यांना फिक्की या संस्थेचा मानाचा पुरस्कार देखील मिळाला आहे.
महिलांबाबतीत घडणारे गुन्हे सतत ऐकायला, वाचायला मिळत असतात. या गुन्ह्यांच्या बाबतीत कठोर कायदे आहे, परंतु हे कायदे अस्तित्वात असून देखील महिलांवरील अत्याचार, हल्ले असे एक न अनेक गुन्हे घडत आहे. हे गुन्हे का घडतात याचा अभ्यास करत असताना पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांच्या समोर काही बाबींचा उलगडा झाला. त्यात प्रामुख्याने महिला, मुलींकडे बघण्याची मानसिकता त्यातून अनेक वेळा होणारे लिंग भेदाचे प्रकार रोखण्यासाठी त्यांनी वेब साईट सुरु करण्यासाठी पुढकार घेऊन अभिन्न या उपक्रमाला सुरुवात केली.
अभिन्न उपक्रमात सात महत्वाचे विषय समोर घेऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. त्यात वेगवेगळ्या खेळांचा देखील समावेश होता. त्यातून मुला, मुलींना लिंग भेदाचे महत्व पटविण्यात आले, हा उपक्रम भविष्यात त्यांची मानसिकता बदलेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली. या उपक्रमाचे पीपीटी प्रेझेन्टेशन त्यांनी शक्ती विधेयक अभ्यास समिती समोर मांडले होते.
पोलीस अधिकारी कर्मचारी यांना सोबत घेऊन शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी, विद्यार्थिनी यांना स्त्री पुरुष समानते जनजागृती त्यांनी सुरु केली. वेगवेगळ्या प्रकारचे खेळ असतील, त्यांचा बघण्याचा दृष्टीकोन, अनेक माध्यमातून त्यांना छेडछाडी, टिंगळटवाळी, रोडरोमीओगिरी, सायबर गुन्हे, ऍ़सिड अटॅक, बलात्कार, घरगुती हिंसा, कौटांबिक हिंसा, या विषयाप्रती संवदेनशिलता निर्माण केली. यासर्वांच मूळ हे मानसिकतेत असते बहुतांश मुलांना मुलींची टिंगल, छेड काढली तर मुलीच्या मानसिकतेवर काय परिणाम होतो, याची जाणीव नसते. परिणामतः अनेक वेळा मुली नैराश्यात जातात, अथवा मुलांचा महिला विषयी गुन्ह्यांकडे कल जातो.
शालेय, महाविद्यालयीन जीवनातच आपण मुला,मुलींना स्त्री पुरुष समानते विषयी जागरूक केले तर नक्कीच गुन्ह्यांचे प्रमाण देखील कमी होऊ शकते. तसेच त्यांचा दृष्टीकोन देखील बदलू शकतो. भविष्यात या वेब साईट मध्ये महिलांच्या संविधानिक अधिकार, कायदे यांनी संपूर्ण माहिती असणार आहे. या उपक्रमाला आणखीन विविध पद्धतीने सजवून त्याला समाजात मांडणार आहे. आणि हा उपक्रम म्हणजे फक्त सुरुवात
आहे. या विषयी आणखीन कार्य करणार असल्याचे पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी सांगितले.
महत्वाच्या बातम्या
- ‘सांगली-जळगावातील सत्ताबदलाला नैतिक अधिष्ठान नसले तरी नैतिक किंवा अनैतिकवर बोलण्याचा अधिकार भाजपने गमावला’
- ‘ठाकरे सरकार’ आल्यापासून लोकांच्या मनातले भय नष्ट झाल्याने लोक निर्भय बनून मतदान करीत आहेत’
- ‘पैसे फेकले की सर्व विकत मिळते हा नवा सिद्धांत भाजपने रुजवला’
- ‘सांगली-जळगावातील करेक्ट कार्यक्रम ही तर नांदी, असे अनेक कार्यक्रम होतील !’
- शाळांचा अनुदानाचा मार्ग अखेर मोकळा, इतके टक्के मिळाले अनुदान
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

