नवी-दिल्ली : उत्तर प्रदेश निवडणुकीला अद्याप वेळ असला तरी त्याच्या पूर्वतयारीला सर्वच पक्षांनी सुरुवात केली आहे. तसेच अनेक पक्षांच्या युतीच्या चर्चांनाही उधाण आले आहे. याच पार्श्वभूमीवर सपा अध्यक्ष अखिलेश यादव आणि काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी या दोघांचा विमानातील एक फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
दिल्ली ते लखनऊ या विमानात अखिलेश आणि प्रियंका समोरासमोर आल्याचा हा फोटो आहे. प्रियंकांच्या एका सहाय्यकाने दिलेल्या माहितीनुसार, अखिलेश आणि प्रियांकाने एकमेकांना शुभेच्छा दिल्या आहेत. या दरम्यान दोघांमध्ये ‘मैत्रीपूर्ण’ संभाषण झाले. त्यांनी एकमेकांना लवकरच भेटले पाहिजे असे सांगितले. तसेच दोघांनी एकमेकांच्या प्रकृतीची विचारपूस केली.
दरम्यान, शुक्रवारी(२२ ऑक्टो.)अखिलेश यादव दिल्लीला पोहोचले होते. त्यांनी मुलायमसिंह यादव यांची भेट घेतली. या बैठकीनंतरच अखिलेश लखनऊला परतत होते. तसेच काँग्रेस सरचिटणीस आणि उत्तर प्रदेश प्रभारी प्रियंका गांधी वड्रा देखील लखनऊला येत होत्या. मिळलेल्या माहितीनुसार प्रियांका गांधी शनिवारी बाराबंकी येथे काँग्रेसच्या ‘प्रतिज्ञा यात्रेला’ झेंडा दाखवणार आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- मुख्यमंत्री सावरकरवादीच, कोणी सूर्यावर थुंकण्याचा प्रयत्न केला तर…- संजय राऊत
- ‘कोरोनामुळे जीव गमावलेल्या ४.५३ लाख कुटुंबीयांना माफीनामा लिहून द्या’, ‘काँग्रेस’ची मागणी
- भारत-पाक सामन्यापूर्वी BCCI ने उचलले मोठे पाऊल, ‘या’ चार खेळाडूंना दिले मायदेशी परतण्याचे आदेश
- ‘नक्षलवाद आणि दहशतवादाइतकेच गांभीर्याने अमली पदार्थाच्या तस्करीत लक्ष द्यावे’
- WhatsApp ही विदेशी कंपनी, भारतीय कायद्याला विरोध करु शकत नाही; केंद्र सरकारचे खडेबोल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

