Share

“चहावाला पंतप्रधान होऊ शकतो तर मी कोविड सेंटर चालवू शकत नाही का?”

Published On: 

पुणे : पुण्यातील कोव्हिड सेंटर एका चहावल्याला चालवायला महाविकास आघाडी सरकारने दिले, असा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला होता. राजीव साळुंखे असे चहा विक्रीत्याचे नाव आहे. पुण्यातील कोविड सेंटरचा घोटाळा झाला असे आरोप करत सोमय्या यांनी महाविकास आघाडीवर टीका केली. या वादानंतर मुंबईतील हा चहावाला चर्चेत आला. सोमय्या फक्त आरोप करून थांबले नाहीत तर त्यांनी परळला जाऊन चहा वाल्याच्या हॉटेलात पाहणी देखील केली. यानंतर चहावाला राजीव साळुंखे याने प्रसार माध्यमांशी संवाद साधत, ‘एक चहावाला या देशाचा पंतप्रधान होऊ शकतो, मी तर बिझिनेसमन आहे.’ मी कोव्हिड सेंटर का चालवू शकत नाही?

साळुंखे यांनी किरीट सोमय्याचे आरोप फेटाळून लावले आहेत. त्यांनी सोमय्या यांच्या सर्व प्रश्नांना उत्तरे देणार असल्याचे सांगितले. मी कोणताही गुन्हा केला नाही. चोरी केली नाही. रीतसर शासनाच्या नियमानुसार टेंडर मिळवले आहे असे राजीव साळुंखे म्हणाले. पुढे बोलताना साळुंखे म्हणाले, सोमय्या सारखे चहावाला, चहावाला ओरडत आहेत. आमच्या हॉटेल ला ७० वर्षे पूर्ण झाली. सोमय्या यांचा जन्मही झाला नव्हता तेव्हापासून आम्ही हॉटेल चालवतो.

सोमय्या विनाकारण मला त्रास देत असून ते हा मुद्दा राजकीय हेतूने उचलून धरत आहेत. मी व्यावसायिक आहे मला व्यवसाय करण्याचा पूर्ण अधिकार असून कोणीही तो हिरावून घेऊ शकत नाही असे राजीव साळुंखे म्हणाले.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!