🕒 1 min read
कोल्हापूर : २०१९ विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर शिवसेनेनं भाजपची साथ सोडल्यानंतर राज्यात राजकीय नाट्य रंगलं होतं. भाजप आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी अचानक सरकार स्थापन केलं. मात्र, सत्तेची ‘मॅजिक फिगर’ गाठता न आल्याने हे सरकार कोसळलं. यानंतर, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षांनी एकत्र येऊन महाविकास आघाडी सरकारची सत्ता स्थापन केली.
दरम्यान, हे सरकार स्थापन झाल्यानंतर सर्वाधिक आमदार असून देखील भाजपला विरोधी बाकांवर बसावं लागलं आहे. यामुळे भाजपने आक्रमक भूमिका घेतली असून सरकारला कोंडीत पकडण्याची एकही संधी सोडलेली नाही. आता, भाजप आणि महाविकास आघाडीतील संघर्ष हा अधिक तीव्र झाला असतानाच उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजप प्रदेशाध्यक्ष व आमदार चंद्रकांत पाटील हे आमने-सामने आले आहेत.
‘हे सरकार महाविकास आघाडीचे सरकार राज्य झोपेत असताना पडेल,’ असं चंद्रकांत पाटील हे दोन दिवसांपूर्वी म्हणाले होते. यावर बोलताना बहुतेक पाटील झोपेतच हे बोलले असतील, असा चिमटा अजित पवार यांनी काढला होता. यानंतर चंद्रकांत पाटील यांचा पारा चांगलाच तापलेला दिसून आलं.
‘शरद पवार झोपेतून उठायच्या आधी शपथ घेऊन तुम्ही मोकळे झाला होता. तुम्ही आमच्या बरोबर सरकारमध्ये सहभागी झाला. शपथही घेतली, पण २८ आमदार सुद्धा तुम्हाला सोबत ठेवता आले नाहीत. सरकार कोणतंही आलं तरी हेच उपमुख्यमंत्री असतात. तत्व नाही, व्यवहार नाही, कशाशी कशाला सांगड नाही. फक्त ज्याचं सरकार त्याच्यासोबत मी जाणार. अजितदादा, यापुढे आमच्याबद्दल बोलताना तोंड सांभाळून बोला. आम्ही फाटके आहोत, आम्ही बोलायला लागलो तर फार अवघड जाईल,’ असा इशारा चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘सर्वत्र अंधार दिसत होता, ते दीड वर्ष नीट झोपू शकलो नाही’
- श्रीलंकेविरुद्ध तिसऱ्या सामन्यात बाद झाल्यावर केलेल्या ‘या’ चुकीमुळे तमिम इक्बालने ठोठावला दंड
- शालूच्या फोटोवर कमेंट्सची गर्दी ; पहा घायाळ करणारा अंदाज
- आयपीएलची घोषणा केली, मात्र टी-२० विश्वचषकासाठी मागितला एक महिन्याचा अवधी; खरे कारण आले समोर
- माही आणि चिकूचं नातं दोन शब्दात सांग ; विराटला चाहत्याचा प्रश्न , दिलं ‘हृदय’ जिंकणारं उत्तर!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

